Pune Porsche Car Accident Case Saamtv
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट, पुणे पोलिस आरोपी मुलाची पुन्हा करणार चौकशी

Pune Kalyani Nagar Accident: पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाची पुणे पोलिस पुन्हा चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी मुलगा सध्या बाल सुधारगृहामध्ये आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणातील आरोपी मुलाची पुणे पोलिस (Pune Police) पुन्हा एकदा चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी मुलगा सध्या बाल सुधारगृहामध्ये आहे. मागच्यावेळी चौकशीदरम्यान अल्पवयीन आरोपी मुलाने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं दिली होती. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस आरोपी मुलाची पुन्हा चौकशी करणार आहेत.

पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलगा सध्या बाल सुधारगृहामध्ये आहे. आरोपीला बुधवारी बाल न्याय मंडळामध्ये हजर करण्यात आले होते. या सुनावणीदरम्यान पुणे पोलिसांनी आरोपी मुलाला १४ दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी केली होती. पोलिसांची मागणी बाल न्याय मंडळाने मान्य केली. त्यामुळे आरोपी मुलाला आता २५ जूनपर्यंत बाल सुधारगृहामध्येच राहावे लागणार आहे. अशामध्ये आता पुणे पोलिस आरोपीची पुन्हा चौकशी करणार आहेत. ज्यावेळा ही घटना घडली होती तेव्हा आरोपीने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं दिली होती. त्यामुळे आता त्याची पुन्हा चौकशी होणार आहे.

दरम्यान, पुण्याच्या कल्याणीनगर परिसरामध्ये भरधाव पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना चिरडले होते. या अपघातामध्ये इंजिनिअर तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून सध्या तो बाल सुधारगृहामध्ये आहे.

तर याप्रकरणी आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल, ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोळ, शिपायी अतुल घटकांबळे, मुंबईतून अटक केलेले दोघेजण हे सर्वजण सध्या पोलिस कोठडीत आहेत. अल्पवयीन आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणात या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT