sunil kamble vs ramesh bagwe Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics: पुण्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस सामना, कोण मारणार बाजी?

Pune BJP Vs Congress: कॅन्टोन्मेंट मतदारसंघात प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही सोडवू आणि महाविकास आघाडीचे सरकार या ठिकाणी नक्की विजयी होईल असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी व्यक्त केलाय.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांच्यासमोर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री असलेले रमेश बागवे यांचे आव्हान असणार आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देणारा हा एकमेव मतदारसंघ आहे. यामुळे हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची काँग्रेसने आशा बळावली आहे. दुसऱ्या बाजूला गेल्या १० वर्षांपासून भाजपकडे राहिलेला पुण्यातील कॅन्टोन्मेंट मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपकडे राहणार का हे पाहणं महत्त्वाचे असेल.

मतदारसंघात प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही सोडवू आणि महाविकास आघाडीचे सरकार या ठिकाणी नक्की विजयी होईल असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी व्यक्त केलाय. तर दुसऱ्या बाजूला '२०१९ मध्ये माझं मताधिक्य कमी होतं पण यावेळी मला ५० हजार पेक्षा अधिक लिड असेल.' असे मत भाजप उमेदवार सुनील कांबळे यांनी सांगितले. सध्या या मतदारसंघामध्ये रमेश बागवे विरूद्ध सुनील कांबळे असा सामना रंगणार आहे.

'विकासाच्या मुद्द्यावर जनते समोर जात आहे आणि याच मुद्द्यावर नागरिक मला पुन्हा संधी देतील. मागच्या निवडणुकीला मला मताधिक्य कमी होतं. पण यावेळी ५० हजार मतांचे लीड मला मिळेल असा विश्वास पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधूमाळीला सुरुवात झालीय. पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजप, महायुतीचे उमेदवार सुनील ज्ञानदेव कांबळे यांच्या प्रचाराचा नारळ महायुती मधील घटक पक्षांच्या शहाराध्यक्षांच्या उपस्थितीत फुटला.

मागील पाच वर्षांच्या काळात या भागातील मूलभूत प्रश्नांवर कामं केली आहे. या भागात वीज आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होता, तो सोडवण्यात आम्हाला यश मिळाले आहे. कोरोना काळात मूलभूत आरोग्य प्रश्न सोडवण्यात वेळ गेला. यामुळे काही विकास कामे करायची राहिली आहेत आगामी काळात ती कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असं देखील सुनील कांबळे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT