Pune Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics: पुण्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये भाजप गड राखणार की काँग्रेसचा पंजा डाव साधणार?

Pune Cantonment Constituency: पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघात झोपडपट्ट्या यासह अनेक प्रमुख पेठा आहेत यासह कोरेगाव पार्कचा काही भाग सुद्धा येतो.

Priya More

Maharashtra Vidhan Sabha: पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ म्हणजे पुणे कँटोन्मेंट किंवा पुणे छावणी हा मतदारसंघ. पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या मतदारसंघात झोपडपट्ट्या यासह अनेक प्रमुख पेठा आहेत यासह कोरेगाव पार्कचा काही भाग सुद्धा येतो. विविध धर्म, जात, सुमदायचे मोठ्या संख्येने नागरिक या भागात राहत असल्यामुळे याला मिनी इंडिया म्हणून सुद्धा ओळखले जातं. या मतदारसंघात मध्यवर्गिय तसेच मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे.

पुणे शहराच्या पूर्वेला असलेल्या मतदारसंघात २००९ मध्ये झालेल्या विधानसभेत काँग्रेसचे रमेश बागवे निवडून आले. आघाडी सरकार मध्ये बागवे यांनी गृहराज्यमंत्री पद भूषविले. २०१४ मध्ये मोदी लाटेत भाजप चे दिलीप कांबळे इथून निवडून आले तर २०१९ मध्ये त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना मतदारांनी त्यांचा कौल दिला.

२०१९ मध्ये झालेल्या मतदानाचा निकाल -

सुनील कांबळे: ५२ हजार १६० मतं

रमेश बागवे: ४७ हजार १४८ मतं

मताधिक्य: ५ हजार ०१२

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे तीन उमेदवार असून पाच नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार तर १२ अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. प्रामुख्याने या मतदारसंघात मात्र भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळेल. भाजप ने त्यांच्या तिसऱ्या यादीत विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने त्यांच्या शेवटच्या यादीत रमेश बागवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. यामुळे यंदाच्या निवडणुकीत कांबळे आणि बागवे यांच्यात सामना होणार आहे.

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या -

- पायाभूत सुविधांचे छोटे मोठे प्रश्न या ठिकाणच्या नागरिकांना सतावत आहेत

- या मतदारसंघात येणाऱ्या घोरपडी परिसरात एका रेल्वे स्थानकावरील उड्डाण पुलाचे काम झाले खरं मात्र दुसऱ्या स्थानकावरुन उड्डाणपूल झालेला नाही.

- ड्रेनेज लाईन, अनधिकृत फेरीवाले, रस्त्याची दुरवस्था, वाहतूक कोंडी यासारखे अनेक प्रश्न या भागातील नागरिकांना भेडसवतात

- पाण्याची समस्या अजूनही या मतदारसंघातील महत्त्वाचा प्रश्न

मतदारसंघात प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही सोडवू आणि आघाडीचे सरकार या ठिकाणी नक्की विजयी होईल असा विश्वास रमेश बागवे यांनी व्यक्त केलाय तर दुसऱ्या बाजूला, २०१९ मध्ये माझं मताधिक्य कमी होतं पण यावेळी मला ५० हजार पेक्षा अधिक लिड असेल असं सुनील कांबळे म्हणतात.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मताधिक्य मिळवून देणारा कॅन्टोन्मेंट हा शहरातील एकमेव मतदारसंघ आहे. यामुळे काँग्रेसला या मतदारसंघातून नक्कीच अपेक्षा आहेत.

गृहराज्यमंत्री राहिलेले बागवे त्यांचं सर्वस्पणाला लावून ही निवडणूक लढवतील यात शंका नाही पण दुसऱ्या बाजूला भाजप ने पुन्हा एकदा कांबळे यांच्यावर दाखवलेला विश्वास कांबळे यांना सार्थ करून दाखवावा लागेल. दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मागील २, ३ वर्षांत राज्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. आता सत्तेत येण्यासाठी युती आणि आघाडी ने कंबर कसली आहे. हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेस कडे जातो का भाजप कॅन्टोन्मेंट वर पुन्हा कमळ बहरणार हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT