कार्यकर्त्यांच्या निवडणुकां आता गुंडाच्या निवडणुका झाल्या का असा प्रश्न पडावा असं सध्याचं चित्र आहे. कारण महापालिका निवडणूकांमध्ये कुख्यात गुंड आणि त्यांचे कुटुंबिय नगरांचे सेवक होण्यासाठी निवडणुकांच्या मैदानात उतरलेत. होय तुम्ही जे ऐकलंय. ते अगदी खरंय. ज्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत ते गुंड आणि त्यांचे कुटुंबिय आता निवडणुकांच्या रंणागंणात उतरतेल पाहा.
नातवाच्या हत्येचा आरोप असलेला बंडू आंदेकर लढवणार निवडणूक
बंडू आंदेकरची बायको आणि सून राष्ट्रवादीची उमेदवार
गजा मारणेची बायको राष्ट्रवादीची उमेदवार
सज्जू मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार
गुंड गणेश कोमकरची पत्नी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात
मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नातवाची हत्या करणारा बंडू आंदेकर निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरलाय. तर त्याची पत्नी आणि सून ज्या खंडणीप्रकरणी संध्या तुरुंगात आहे त्यांनाच राष्ट्रवादीनं भवानीपेठमधून अधिकृत उमेदवारी दिलीये. तर डझनभर गंभीर गुन्हे असलेल्या गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीनं निवडणुकीचा एबी फॉर्म दिलाय. तर वनराज आंदेकरच्या हत्येचा आरोप असलेला गुंड गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर नानापेठ मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरलीये. तर मुंबईत हत्येसारखा गंभीर आरोप असलेला कधीकाळी तडीपार असणारा सज्जू मलिक प्रभाग क्रमांक 109 मधून राष्ट्रवादीचा उमेदवार आहे.
या गुंडांच्या कुटुंबियांना राजकारणात रेड कार्पेट घातलंय ते प्रचंड शिस्तीच्या उपमुख्यमंत्री अजित दादांनी.. कारण याच अजितदादांच्या राष्ट्रवादीनं या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलंय. पुण्यातली कोयता गँग, धडाधड झालेल्या हत्याकांडानंतर बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर बोलतांना अजितदादांनी पोलिसांना जाहिर तंबी दिली होती. पण याच अजित दादांनी गुंडांच्या कुटुंबियांना राजकारणातील मुख्य प्रवाहात आणून राज्यसमोर कोणता मोठा आदर्श ठेवला असा प्रश्न उपस्थित झालाय. महिलांनी राजकारणात जरुर यावं पण त्यांना मिळालेल्या सत्तेचा त्यांच्या घरातील गुंडांकडून गैरवापर होऊ नये इतकंच.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीनं डोकंवर काढल्यानं पोलिसांचे टेन्शन आणि पुणेकरांचा जीव धोक्यात आणलाय. आता याच गुंडाच्या नातेवाईकांना आणि गुंडाना तिकीट मिळाल्यामुळे पुण्यात गुन्हेगारांना बळ मिळेल की जनता त्यांना घरी पाठवेल हे पाहणं महत्वाचंये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.