BJP  saam tv
मुंबई/पुणे

Pune Politics: पुण्यात भाजपला मोठा धक्का; माजी आमदार फुंकणार तुतारी, प्रचारही केला सुरू

Former Bjp Mla : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी, अशी लढत होणार आहे. जय-पराजयाच्या आधी दोन्ही बाजूने मोर्चेबांधणी केली जात आहे. तर नाराज नेत्यांना आपल्या पक्षात करून घेत आहेत.

Bharat Jadhav

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महायुतीला धक्के देणं सुरू आहे. भाजपमधील नेत्यांना आपल्या पक्षात समाविष्ट करत भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का देत आहे. काही दिवसांपूर्वी कागल येथे भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाडगे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आत्ता तर पुण्यात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार यांनी थेट आगामी विधानसभेसाठी तुतारीच आपलं चिन्ह असणार असल्याचं जाहीर करत प्रचाराला सुरुवात केलीय.

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे हे भारतीय जनता पक्षामध्ये असताना ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुतारी हातात घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती मात्र काल सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंडळांना भेट देत असताना बापू पठारे यांनी थेट आगामी विधानसभेसाठी आपण तुतारी हाती घेणार असल्याचं आणि मंडळांना तुतारीला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

कोल्हापुरात भाजपला धक्का

राष्ट्रवादीची मूळ ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात आता पवारांनी मोहरे हलवण्यास सुरुवात केलीय. कागलमधून मुश्रीफांच्याविरोधात आव्हान कडवे करण्यासाठी शरद पवार यांनी थेट भाजपमध्येच सुरूंग लावला. शरद पवार यांनी समरजितसिंह यांना आपल्या पक्षात घेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला.

घाटगे यांच्या प्रवेशाने शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. त्याचबरोबर इंदापूरमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा देण्याची रणनिती शरद पवार यांनी आखलीय. इंदापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशा चर्चा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात पुन्हा खिंडार, शिंदेंच्या शिवसेनेत अनेकांचा प्रवेश

SCROLL FOR NEXT