Pune Politicians Distribute Chicken Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News: आयडी दाखवा आणि आखाड साजरी करा, पुण्यात तब्बल ५००० किलो चिकनचे वाटप

Pune Politicians Distribute Chicken: पुण्यात धानोरीमध्ये ५००० किलो मोफत चिकन वाटपाची धूम. मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी ओळखपत्रावर मोफत चिकन देण्याचा अनोखा उपक्रम, नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह!

Akshay Badve

अक्षय बडवे, साम टिव्ही प्रतिनिधी

पुणेकरांचा काही नेम नाही! आखाडचा शेवटचा रविवार निमित्त चिकन मटणच्या दुकानाबाहेर रांग आहेच पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडून सुद्धा घेतला जातोय. याचं कारण म्हणजे पुण्यातील धानोरी परिसरात एका दांपत्याने तब्बल ५००० किलो चिकन मोफत वाटण्याचा उपक्रम राबवला आहे. मतदार यांच्यापर्यंत पोहचता यावं आणि जनसंपर्क वाढावा म्हणून ही शक्कल पुण्यात पाहायला मिळते आहे. चिकन घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ओळखपत्र घेतलं जातं आहे आणि मगच चिकन फ्री मिळतंय.

पुणेकर हे खवय्ये म्हणून फक्त देशात नाही तर भारतात प्रसिद्ध आहेत असं मानलं जातं. आता आखाडचा शेवटचा रविवार म्हणल्यावर पुणेकर सुट्टी देणार का? यावर्षी गटारी अमावस्या गुरुवारी येते त्यामुळे सुट्टी नसल्याने सर्वजण आखाड्याचा शेवटचा रविवार अगदी जोरात साजरी करायचा म्हणून सकाळपासूनच प्लॅन करत आहेत. पुण्यातील प्रत्येक चिकन मटन आणि मासोळी दुकानांच्या बाहेर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केलीय.

आता पुण्यात राजकीय पुढारी किंवा पदाधिकारी नेहमीच अशा दिवसांचा फायदा करून घेतात. आखाडाचा शेवटचा रविवारचा फायदा सुद्धा पुढाऱ्यांनी केलाय बरं का. पुण्यातील धानोरी परिसरात धनंजय जाधव फाउंडेशन यांच्या वतीने चक्क नागरिकांसाठी ५००० किलो चिकन मोफत ठेवलं आहे. धानोरी परिसरातील ४ दुकानांवर हा उपक्रम राबवला जातोय. ओळख पत्र दाखवायचं आणि चिकन मोफत न्यायचं! असं सोपं असेल तर पुणेकर नाही म्हणणार का? धानोरी परिसरातील नागरिकांनी या दुकानांवर एकच गर्दी केलीय.

या उपक्रमाबद्दल बोलताना, धनंजय जाधव म्हणाले, "सगळे राजकीय पक्षाचे नेते आखाड पार्टी फक्त विशेष चेहऱ्यांना पाहून देतात. आखाड सगळ्यांनाच साजरी करता यावा यासाठी ही कल्पना सुचली. एका किलो मध्ये कुटुंबातील ४ जणं तर नक्की जेवतात त्यामुळे सगळ्यांना हा दिवस साजरा करता यावा."

मोफत चिकन वाटप करत असताना यंत्रणांनी सुद्धा त्यांच्याकडून चोख कार्यवाही बजावली आहे. पोलिसांकडून या ठिकाणी असलेल्या चिकनचे नमुने तपासणीसाठी सुद्धा नेले आहेत. एकंदरीत काय तर आखाड स्पेशलसाठी पुण्यात आज सकाळपासून नागरिकांमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत मंगळवारी बदल

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात अंगारकी चतुर्थीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, दगडूशेठ गणपती दर्शनासाठी विशेष नियोजन

Rupali Chakankar : वेदनादायक!रक्षाबंधनालाच रूपाली चाकणकरांवर शोककळा, लाडक्या भावाचे निधन

Fraud Case : पाचोऱ्यातील दांपत्याचा अजब कारनामा; उपमुख्यमंत्र्याचा पीए असल्याचे सांगत १८ जणांची फसवणूक

Sayali Sanjeev: सायली संजीवचा कॅज्युअल लूक, PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT