Congress News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Congress News : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, नाना पटोलेंसमोरच नेत्यांनी व्यक्त केली नाराजी

Political News : काँग्रेस विरोधात काम केलेल्यांना जवळ केलं जात असल्याच्या आरोप माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केला आहे.

Prachee kulkarni

Pune Congress News : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यविरोधात पक्षातील काही नेते नाराज आहे. पुणे काँग्रेसमधील काही नेत्यांनीही नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

पुण्यातील काँग्रेसच्या लोकसभा आढावा बैठकीत हा नाराजीचा सूर दिसून आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच काही नेत्यांना आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस विरोधात काम केलेल्यांना जवळ केलं जात असल्याच्या आरोप माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केला आहे. (Maharashtra Political News)

प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काय करायचं?

गटबाजी थांबली नाही तर आता चर्चा करण्यात अर्थ नाही. ज्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात काम केलं त्यांना बडे नेते सोबत घेऊन बसत आहेत. मग प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काय करायचं, असा सवाल रमेश बागवे यांनी विचारला. पक्ष टिकला तर आपण टिकू शकतो. असं चालत राहिलं तर पक्ष कसा मोठा होणार. आपले आमदार आले तर आपण मुख्यमंत्री बनवू शकतो, असंही बागवे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतलं नाही

नाना पटोले पुण्यात विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान सतत येत होते. त्यावेळी त्यांनी काही पक्षप्रवेश केले. मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीवेळी यातील काही कार्यकर्ते भाजपसोबत गेले होते. या पक्षप्रवेश प्रक्रियेत स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही. प्रदेशाध्यक्ष किंवा इतर नेते असे निर्णय घेत असतील तर आम्हालाही विश्वासात घेतलं गेलं पाहिजे, असं काँग्रेस नेत्यांच म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT