Amitesh Kumar Yandex
मुंबई/पुणे

Pune Police: पुण्यात हुक्का पार्लर बंद होणार; बार, पब, रेस्टॉरंटला वेळेचं बंधन, अमितेश कुमार यांचा निर्णयांचा धडाका

Restrictions For Bars Pubs Restaurants Pune: पुणे पोलीसांची आता रूफ टॉप हॉटेल्सवर करडी नजर असणार आहे. पुण्यातील बार, पब्स जर रात्री दिड वाजेनंतर सुरू असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे.

Rohini Gudaghe

Police Commissioner Amitesh Kumar Press Conference

पुण्यात पकडलेल्या ४ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद (Amitesh Kumar Press Conference) घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील बार, पब्स रात्री दिड वाजल्यानंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी पुणे शहराचे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी भार स्विकारला आहे. (Latest Marathi News)

पुणे पोलीस (Pune Police) आता अॅक्शनमोडमध्ये आल्याचं दिसतंय. पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट यांना पुणे पोलीस आता नोटीस पाठवणार आहेत. कलम १४४ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात येणार आहे. आता पुण्यातील बार, पब्स रात्री दिड वाजेनंतर सुरू असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे शहरातील हुक्का पार्लर बंद

पुणे पोलीस रूफ टॉप हॉटेल्सवर करडी नजर ठेवणार आहेत. शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात येत (Restrictions For Bars Pubs Restaurants ) आहेत. पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. पुण्यात पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले (Bars Pubs Restaurants Pune) होते. पुण्यात ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आलं आहे. याप्रकरणी ड्रग्स तस्करांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ३ ड्रग्स तस्करांना अटक केली आहे.

पुणे पोलीस अलर्ट मोडवर

पोलीस ठाण्यात ५ वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण केलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार (Pune Crime) आहे. तसंच कुठलाही अधिकारी जर एकच ठिकाणी ३ वर्षांपासून असेल. त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही तिथेच असेल तर त्याची सुद्धा बदली केली जाईल. गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या ५० सोशल अकाउंटवर कारवाई केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पुणे शहरात पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार (Police Commissioner Amitesh Kumar) आल्यानंतर गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी क्राईम इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे. अमितेश कुमार यांनी शहरातील कुख्यात गुंड गजानन मारणेसह सराईत गुन्हेगारांची परेड घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT