मुंबई : क्रूझवर अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात पंच आणि साक्षीदार kiran gosavi याची अटक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. किरण गोसावी kiran gosavi हा महाराष्ट्राबाहेर असून तो सध्या उत्तर प्रदेशात असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतं आहे. आता किरण गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल kiran gosavi audio clip होत आहे.
आपल्याला सरेंडर करायचे आहे, असे किरण गोसावी लखनऊ पोलिसांना या व्हायरल ऑडिओ क्लिकपमध्ये म्हणत आहे. तर पोलिस अधिकारी त्याला सरेंडर करून घेण्यास स्पष्टपणे नकार देत असल्याचे ऐकायला देखील येतं आहे. गोसावी लखनऊमध्ये आहे, हे समजताच पुणे पोलिसांचे pune police पथक रवाना झाले आहे. यामुळे आता गोसावीची अटक निश्चित मानली जात आहे. पुणे पोलिसांचे पथक गोसावीला अटक करण्याकरिता लखनौला रवाना झाले आहे.
हे देखील पहा-
गोसावीवर आतापर्यंत ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फसवणूक प्रकरणी गोसावी विरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी गोसावी याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये तो सरेंडर करण्याकरिता लखनऊ पोलिसांकडे गेला असे समजत होते.
मात्र, लखनौ पोलिसांनी गोसावीला अटक करुन घेण्यास नकार दिल्याचे समजत आहे. इतर ठिकाणी सरेंडर होण्याचा सल्ला लखनऊ पोलिसांनी दिला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवर अंमली पदार्थ पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. या प्रकरणी आर्यन खान हा तुरुंगात आहे.
आर्यन खानच्या सुटकेसाठी किरण गोसावीने शाहरुक खानची मॅनेजर पूजाशी कोट्यवधींची डील केल्याचा आरोप या प्रकरणामधील साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे. किरण गोसावीची २५ कोटींची डील झाली आहे. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा आरोप प्रभाकर साईलने केला आहे. यामुळे आरोपांनंतर किरण गोसावी महाराष्ट्राबाहेर आहे. आर्यन खानसोबतचे किरण गोसावीचा फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान, आर्यनच्या सांगण्यावरून आपण शाहरुखच्या मॅनेजरला फोन लावला होता, असे किरण गोसावीचे म्हणणे आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.