Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: शोरुममध्येही नसतील एवढ्या गाड्या पोलिसांच्या ताब्यात, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने दुचाकी जप्त केल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune Crime News : पुणे पोलिसांकडून बाईक चोरी प्रकरणी विक्रमी कारवाई केली आहे. पोलिसांनी ७ आरोपींकडून चोरीला गेलेल्या ५४ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या १६२ बाईक जप्त केल्या आहेत. पुणे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने दुचाकी जप्त केल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात दुचाकी वाहन चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. शहराच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जात होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये आपल्या गाड्यांविषयी चिंता होता. नागरिकांची हीच चिंता लक्षात घेतील पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. (Latest News Update)

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याविषयी विशेष अभियान राबवून चोरी गेलेल्या तब्बल १६२ दुचाकी जप्त केल्या आहेत. एखाद्या शोरुममध्येही एवढ्या बाईक नसाव्या एवढ्या बाईक पोलीस स्टेशनमध्ये दिसत होत्या. गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकाने राज्यातील वेगवेगळ्या शहरातून या दुचाकी जप्त केले आहेत. (Crime News)

या चोरी प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी या दुचाकी शहरातून चोरून ग्रामीण भागात स्वस्त किमतीत विकायचे. अखेर पोलिसांनी या सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT