Beed Rain News: मांडव सजला, वऱ्हाडी जमले... पण अवकाळीनं सर्वांच्याच आनंदावर पाणी फेरलं; मन हेलावणारा VIDEO

Beed Rain News: बीडमधील काही भागात भागात आज अवकाळी आणि गारपीटीने जोरदार हजेरी लावली.
Beed Rain
Beed RainSaam Tv
Published On

Beed Rain Video : लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक विस्मरणीय क्षण. नवरा-नवरीसह दोन्हीकडील मंडळी काही दिवस आधापासूनच मोठ्या उत्साहात तयारी सुरु करतात. बीडमधील एका जोडप्यानंही आपल्या लग्नाचं असंच स्वप्न पाहिलं. मात्र या जोडप्याच्या स्वप्नांवर अवकाळीनंतर पाणी फेरलं.

बीडमधील काही भागात भागात आज अवकाळी आणि गारपीटीने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसानीच्या घटनाही समोर आल्या आहे. असाच एक लग्न सोहळ्यांचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. (Latest News Update)

Beed Rain
Maharashtra Unseasonal Rain Update: अवकाळीचा फटका! बीडमध्ये पुरामुळे 10 गावांचा संपर्क तुटला, राज्यात मोठं नुकसान

लगीनघरात आनंदाचं वातावरण, मांडव सजला, वऱ्हाडी जमले. आज सकाळपर्यंत सर्वकाही उत्साहात होतं. मात्र दुपारी लग्न लागायच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीठीनं काही क्षणात होत्याचं नव्हतं केलं. लग्नासाठी उभारलेला मंडप वादळी वाऱ्यात उडून गेला. त्यामुळे जमलेल्या वऱ्हाड्यांना गारांनी झोडपून काढलं.

लोकांनी मंडपातून पळापळ करत आजूबाजूला आडोशाचा आधार घेत गारांपासून स्वत:चं संरक्षण केलं. काहींनी डोक्यावर गाद्याही घेतल्या. जेवणांचं पाऊस पाण्यामुळे मोठं नुकसान झालंय. व्हायरल व्हिडीओ बीडमधील नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही. आपलं बीड या ट्वीटर हँडरवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलं आहे.

बीडमध्ये अवकाळीचा कहर

बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने  पुन्हा एकदा कहर केलाय. जिल्ह्यातील बीड, गेवराई, केज, अंबाजोगाई, माजलगावसह सर्वच ठिकाणी तुफान पावसासह गारपिटीने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. तर यादरम्यान वीज पडून शेतात काम करत असताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले. ही दुर्दैवी घटना बीडच्या केज तालुक्यातील केळगाव आणि काळेगावमध्ये घडलीय.

Beed Rain
CM Eknath Shinde on Barsu Refinery Protest: आंदोलकांवर लाठिचार्ज झालेला नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

अंबाजोगाईच्या वाघाळा परिसरात वीज पडून 3 बैल, 2 म्हैस आणि 2 शेळ्या दगावल्या आहे. तर मुसळधार पावसामुळे बीड शहरातील मुख्य बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप आलं आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्याने, जीवितहानीसह घरांची पडझड झाली आहे. त्याचबरोबर शेतपिकांचे देखील नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडल्याने, भोजगाव परिसरातील अमृता नदीला पूर आला आहे. यामुळे भोजगावसह कोमलवाडी, देवपिंपरी, अंतरवली, कळण्याचीवाडी, भोंडगाव तांडा, धोंडराई, देवपिंप्री, पिंपळगाव, माटेगाव या 10 गावांचा संपर्क तुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com