PUNE POLICE RECRUITMENT SCAM saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात पोलीस भरतीतील घोटाळा उघड, बनावट क्रीडा प्रमाणपत्रांद्वारे नोकरीवर डल्ला

Pune Police Recruitment Fraud: पेपरफुटीच्या घटना ताज्या असतानाच, आता बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हा घोटाळा नेमका काय आहे?.... आणि तो कसा उघडकीस आलाय?

Rohit Kadam

पेपरफुटीवरून देशभरात वातावरण तापलेलं असताना राज्यात नवा घोटाळा समोर आलाय. पुण्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तब्बल 19 पोलीस कर्मचाऱ्यांनी कुराश आणि ड्रॅगनबोट या खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांद्वारे सरकारी आरक्षणाचा गैरफायदा घेतलाय. दरम्यान, पुण्यातून उघडकीस आलेला पोलीस भरती घोटाळा नेमका काय आहे? ते पाहूयात...

पुण्यात पोलीस भरतीतील घोटाळा उघड

3 ते 5 लाख रुपयांना प्रमाणपत्र विकल्याचा संशय

तब्बल 500 ते 600 जणांना प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती

बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी 70 जणांची चौकशी

या प्रकरणी दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

2016 ते 2026 दरम्यानच्या कालावधीत घडला घोटाळा

बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे या आरोपींना गुन्हे शाखेनं अटक केलीये. एव्हंढच नव्हे तर बनावट प्रमाणपत्रांद्वारे पोलीस दलात भरती झालेल्या 19 कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे. गेल्या 10 वर्षांत भरती उमेदवारांपैकी 9 जण प्रशिक्षणासाठी गेल्याचे तपासात निदर्शनास आलंय.

खरंतर, व्यावसायिक अभ्याक्रमांच्या प्रवेश परीक्षा आणि नोकरभरतीत झालेल्या पेपरफुटीमुळे राज्यासह देशभरात संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे पुणे पोलीस भरती घोटाळ्यात पोलिस दलातील आणि क्रीडा विभागातील कुणी बडे धेंडे आहेत का? आणि या भरती घोटाळ्यात कुणाचे उखळ पांढरे झालेत?.याचा तपास होणं गरजेचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Fare Hike : विमान प्रवास महागला, दिवाळीपूर्वी तिकिटाच्या दरात ४ पटीने वाढ, प्रवासासाठी किती मोजावे लागणार?

Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Maharashtra News Live Update: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

SCROLL FOR NEXT