Pune Police Raid Thai Spa Saam Tv News
मुंबई/पुणे

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून छापा, ७ तरूणींची सुटका

Pune Police Raid Thai Spa: स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत देहविक्री व्यवसाय करणाऱ्या सात मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

  • स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट

  • पोलिसांची स्पा सेंटरवर धाड

  • देहविक्रीच्या जाळ्यात अडकलेल्या सात मुलींची सुटका

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला आहे. छापा टाकून पोलिसांनी सात तरूणींची सुटका केली आहे. पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

ही घटना पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथील आयकॉन बिल्डिंगमधून उघडकीस आली. शॉप नंबर २०१ आणि २०४ या ठिकाणी द औरा थाई स्पा सुरू आहे. या स्पामध्ये अवैध कारभार सुरू होता. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवण्यात येत होता. देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी धाड टाकली.

या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने धाड टाकत कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी द औरा थाई स्पा सेंटरचे मालक अभिजीत लॉरेन्स (वय वर्ष ३०) याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी देहविक्रीचा व्यवसायावर धाड टाकल्यानंतर अवैध वस्तू जप्त केले. तसेच देहविक्रीच्या जाळ्यात अडकलेल्या सात मुलींची सुटका केली. या प्रकरणानंतर पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. परिसरातील आणखी कोणत्या स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू आहे का? याचा शोध देखील पोलिसांकडून घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT