Pune Police Commissioner Amitesh Kumar orders suspension of PRO assistant following serious misconduct allegations.  saam tv
मुंबई/पुणे

Pune Police: आयुक्तांच्या नावाने एसीपींना दम; पोलीस आयुक्तांच्या PRO सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन

Pune Police PRO Assistant Police Suspended : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पीआरओ सहाय्यकाला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या नावाने एसीपीला धमकावल्याचा आरोप झाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • पुणे पोलीस आयुक्तांच्या PRO सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन

  • आयुक्तांचे नाव सांगून ACP वर दबाव टाकण्याचा गंभीर आरोप

  • जमिनीच्या वादात बिल्डरला मदत करण्याचा प्रयत्न उघड

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुणे जनसंपर्क अधिकारी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे पीआरओ सहायक पोलीस फौजदार प्रवीण घाडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू झाली असून, सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

पुणे पोलीस आयुक्तांचे नाव सांगत एसीपीना फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न घाडगे यांनी केला होता. आंदेकर टोळीशी संपर्कात असलेला बिल्डर अविनाश पवार याला जमिनीच्या वाद प्रकरणात मदत मिळावी, यासाठी हा दबाव टाकला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्याने कोणतीही मदत करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी याबाबत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिला.

त्यानुसार ‘स्टेनली’ नावाचा मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले. तो थेट घाडगे यांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने स्टेनलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. घाडगे यांनी प्रकरण मिटवण्यासह तडजोडीसाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याचे स्टेनलीने कबूल केले.

तसेच आंदेकर टोळीशी संबंधित अविनाश पवार याचे प्रकरण घेऊन घाडगे यांच्याकडे गेल्याची कबुलीही दिली. घाडगे यांच्याविरोधात यापुर्वीही पोलीस आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून प्रकरणे मिटवण्याचा दबाव टाकत असल्याचे स्पष्ट झाले होते. तक्रारीनंतर त्यांची ‘भरोसा सेल’मध्ये बदली केली होती. मात्र तरीही त्यांच्या कृत्यांना आळा बसला नाही. पीआरओ पदाचा गैरवापर करून सातत्याने अनैतिक व बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी झाल्याने यांचे निलंबन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : 'सगळ्यांना हाणलं नाही तर...' आव्हान खरे ठरले; जयंत पाटील यांचा ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम

Navi Mumbai Airport: दोन दिवसात नवी मुंबई एअरपोर्ट होणार सुरु; काय सुविधा मिळणार? जाणून घ्या A टू Z माहिती

Maharashtra Live News Update: पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग

लोकलमध्ये दहशत, महिलेला धावत्या ट्रेनमधून ढकललं

Navy Plane Crash: अमेरिकेत नेव्हीचं विमान कोसळलं, ५ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT