Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यातील नराधमांना शोधण्यासाठी आता AIची मदत; आरोपीना पकडण्यासाठी जाहीर केले १० लाखांचे बक्षीस

Tanvi Pol

पुण्यातील बोपदेव घाटात युवतीवर बलात्कार प्रकरणानं संताप व्यक्त होतोय. या घटनेतील तीन नराधम पोलिसांना गुंगारा देत अद्याप मोकाट फिरतायेत. ५ दिवसांपासून पोलिसांच्या तपासाला पुर्णपणे अपयश आलंय. म्हणूनच आता आरोपींना शोधण्यासाठी १० लाखांचं बक्षिस जाहीर करावं लागलं.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात(Pune) कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत. ड्रग्ज तस्करी, कोयता गँगचा धुमाकूळ, हिट अँण्ड रनच्या घटनांनी पोलिसांच्या कर्तव्यावर बोट ठेवलं जातंय. पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनलाय. बोपदेव घाटात युवतीवर बलात्कार प्रकरणानं त्यात भर पडलीये. या घटनेतील तीन नराधम पोलिसांना गुंगारा देत अद्याप मोकाट फिरतायेत. ५ दिवसांपासून पोलिसांच्या तपासाला पुर्णपणे अपयश आलंय. म्हणूनच आता आरोपींना शोधण्यासाठी १० लाखांचं बक्षिस (Reward)जाहीर करावं लागलं.

प्रकरण तरी काय?

पुण्यातील २१ वर्षीय तरुणी तिच्या मित्रासह बोपदेव घाटात फिरायला गेली होती. तिथेच एका आरोपीने त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्याच्या इतर दोन मित्रांना बोलावून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तिच्या मित्राला एका झाडाला शर्ट आणि पट्ट्याने बांधून ठेवले होते, अशी माहिती पीडित तरुणांनी पोलिसांनी दिली.

आतापर्यंत पोलिस तपासात काय झालं?

पुण्यातील बोपदेव घाटात युवतीवर बलात्कार प्रकरणात पोलिसांना आतापर्यंत आरोपींचे CCTV हस्तगत करण्यात यश मिळावे आहे. प्राप्त झालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचे स्केच तयारही करण्यात आले आहे. एवढेच नाही तर २०० पेक्षा अधिक संशयितांची पोलिसांनी चौकशी केली असून ३ हजार मोबाईल क्रमांकांची तपासणी झालेली आहे. सध्या पोलिसांनी पुण्यातील बोपदेव घाटात युवतीवर बलात्कार प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी चक्क AIची मदत घेण्याची ठरवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: स्वपक्षीय साथ देणार की पाठ दाखवणार? विधानसभेला अजित पवार यांची अग्निपरीक्षा; वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Politics : भुजबळ-कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात महायुतीत कुरघोडीचं राजकारण, VIDEO

Health Tips: बुलेटप्रूफ कॉफी तुम्ही प्यायलात का? वाचा आश्चर्यकारक फायदे

Mumbai 26/11 Attacks:...तर माझी संपूर्ण मालमत्ता बॉम्बनं उडवून द्या; रतन टाटा यांनी थेटच सांगितलं होतं, VIDEO

Assembly Election: भाजपला पुण्यात सर्वात मोठा धक्का; संजय काकडेंसह 10 आजी-माजी आमदार, 20 नगरसेवक फुंकणार तुतारी

SCROLL FOR NEXT