उद्योजक नानासाहेब गायकवाड व कुटुंबाविरुद्ध पुणे पोलिसांची "मोका"ची कारवाई  Saam Tv
मुंबई/पुणे

उद्योजक नानासाहेब गायकवाड व कुटुंबाविरुद्ध पुणे पोलिसांची "मोका"ची कारवाई

उद्योजक नानासाहेब गायकवाड, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावयासह ८ जणांविरुद्ध पुणे पोलिसांनीही महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : कौटुंबिक छळासह खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावयासह ८ जणांविरुद्ध पुणे पोलिसांनीही महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी याअगोदर गायकवाड कुटुंबावर "मोका' नुसार कारवाई केली आहे. त्यापाठोपाठ पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही त्यांच्याविरुद्ध "मोका' चा बडगा उगारला आहे.

नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड सर्वजण रा.एनएसजी हाऊस, औंध, सोनाली दिपक गवारे (वय- 40), दिपक निवृत्ती गवारे (वय- 45) दोघेही रा. गजानन महाराज मंदिराजवळ, शिवाजीनगर, राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा.सर्वोदय रेसीडेन्सी, विशालनगर, पिंपळे निलख, मुळ रा. श्रीरामपुर, नगर), सचिन गोविंद वाळके, संदिप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हे देखील पहा-

त्यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत गुन्ह्यात संशयित आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे पैसे देऊन, पैशांच्या वसुलीसाठी गोळीबार करीत, जबरदस्तीने कोऱ्या कागदावर साह्या घेतले होते. व्याजाच्या पैशातुनच लोकांच्या जागा, वाहने बळकावून बेहिशोबी संपत्ती जमविल्याचा पोलिसांना संशय होता.

नानासाहेब गायकवाड, त्याचा मुलगा आणि साथीदारांनी मागील काही वर्षात खुनाचा प्रयत्न, खंडणी, जीवे मारण्याची धमकी, दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, कट रचून फसविणे, अवैध खासगी सावकारी केल्याबाबतचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. नानासाहेब गायकवाड हा टोळीप्रमुख असून, त्याने कुटुंबातील सदस्य आणि साथीदारांची संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून, विविध गुन्हे केले आहेत.

प्रतिष्ठीत आणि महत्वाच्या व्यक्तींशी संबंध निर्माण करून, गरजू व्यक्तींना बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देत, त्यांच्याकडून मुद्दल, व्याजासह पैसे घेण्याबरोबरच त्यांच्या मालमत्ता बळकावून बेहिशोबी मालमत्ता जमा केली आहे. त्याच्याविरुद्ध "मोका' अंतर्गत कारवाई व्हावी, यासाठीचा प्रस्ताव परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पुर्व प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. त्यास पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT