Pune News update  Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Pune News update : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाकण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्तांनी दिले आहे. याबाबत पुणे पोलिसांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

Vishal Gangurde

पुण्यातील रामवाडी पोलिस चौकीच्या उद्घाटनाला अमितेश कुमार आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी हजर

उद्घाटन प्रसंगी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे दिले आदेश

पोलिसांना परिसर स्वच्छ ठेवणे, गुन्हेगार शोधणे आणि अवैध दारू, भंगार व्यवसाय थांबवणे याचे ही पोलीस आयुक्तींनी दिले निर्देश

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील रामवाडी पोलिस चौकीच्या उद्घाटन प्रसंगी पोलिस अमितेश कुमार यांच्यासह पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी भाषणात अमितेश कुमार यांनी नेहमीप्रमाणे अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अमितेश कुमार बोलताना म्हणाले, रामवाडी पोलीस चौकीचे आज उद्घाटन झालं याबद्दल सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. समस्यांचे निरसन पारदर्शकपणे "स्वच्छ" करण्यात येईल. परिणामकारक तुम्हाला सगळ्यांना दिसेल.

अधिकाऱ्यांना सूचना देताना आयुक्त म्हणाले, "अधिकारी यांना सांगतो की लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत परिणामकारक सुधार घडवून आणायला लागेल. पोलिस अधिकाऱ्यांना सूचना आहे की रामवाडी मधील अवैध धंदे उद्या सूर्योदयाच्या पूर्वी तोडून टाका. मन परिवर्तन करा नाहीतर खाकी भाषेतून त्यांचे मन परिवर्तित करा. एक थेंब अवैध दारू विकू देणार नाही, अंडा बिन्ड काही विकू देणार नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले, "तुमच्या केसाला पण धक्का लागू देणार नाही, प्रथम अवैध धंदा बंद करा, हा परिसर स्वच्छ झाला पाहिजे. जे गुन्हेगार आहेत त्यांची नावं शोधा आणा आणि बसवा. रस्त्यात असलेल्या भंगार व्यवसाय असेल तर तो काढून टाका, फालतू टपरी लावून चालू देणार नाही. घरात मन न लागणारे लोकं आहेत ते थर्ड क्लास आहेत त्यांना पूर्णपणे स्वच्छ करायला पाहिजे. कारवाई आम्ही अशी करू की सात पिढ्या लक्षात ठेवतील. अवैध सावकारी करणाऱ्या यांचा लोकांचा आम्ही चौकात सत्कार करू."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Marathi Actress : ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा निर्णय; राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार परत केला, नेमकं कारण काय?

साखरपुड्यानंतर गावी आला, तरुणाला टोळक्यांनी गाठलं, धारदार शस्त्रांनी सपासप वार, पहाटे नेमकं झालं काय?

Weight loss: वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका, Weight Loss करत असाल तर या ४ चुका टाळा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो ₹१५०० मिळत नाही? टेन्शन सोडा, सरकारने घेतला मोठा निर्णय; आता प्रत्येक जिल्ह्यात...

SCROLL FOR NEXT