Two Arrested After Police Raid Hotel in Punes Koregaon Park Saam Tv News
मुंबई/पुणे

पुण्यातील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; विदेशी महिलांचा बाजार, पोलिसांनी 'असा' उघडा पाडला डाव

Two Arrested After Police Raid Hotel in Punes Koregaon Park: पोलिसांनी कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत पोलिसांनी एका विदेशी महिलेसह दोन परराज्यातील महिलांची सुटका केली.

Bhagyashree Kamble

  • कोरेगाव पार्कमधील हॉटेलवर छापा

  • वेश्याव्यवसाय रॅकेट उघडकीस

  • २ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हॉटेलवर छापा टाकला. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी एका विदेशी महिलेसह २ परराज्यातील महिलांची सुटका केलीय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली. तेव्हा हॉटेलमध्ये गुप्त माहितीच्या आधारे मिळालेली बातमी खरी ठरली. पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरात विदेशी आणि परराज्यातील महिलांकडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध (एएचटीयू) कक्षाला याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

पोलिस पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने द हेवन हॉटेल येथे सापळा रचला. कारवाईदरम्यान आदित्य सिंह आणि राहुल सन्याशी यांच्या सांगण्यानुसार महिलांना वेश्याव्यवसायासाठी आणले जात असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी आदित्य अनिलकुमार सिंह (वय ३१, रा. जर्मन बेकरीजवळ, कोरेगाव पार्क) आणि राहुल मदन ऊर्फ राहुल सन्याशी या संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर कोरेगाव पार्क परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipith Mahamarg: शक्तिपीठ महामार्गात बदल, आता कोणत्या जिल्ह्यातून आणि कसा जाणार?

Facial Hair Remover: चेहऱ्यावरील नको असलेले केस कसे काढायचे?

CBSE मध्ये शिवरायांचा २१ पानांचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्रात १११ कोटींचा घोटाळा; कार्यकारी अभियंता निलंबित, नेमकं प्रकरण काय?

Pune : पुण्यात बायकर्सची स्टंटबाजी! पर्यटकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

SCROLL FOR NEXT