Pune News Saam
मुंबई/पुणे

Pune News: वेश्या व्यवसायासाठी मुलीची ३ लाखांत विक्री, बंद खोलीत डांबून ठेवलं अन् मग..

Minor Foreign Girl Sold for Rs 3 Lakh in Pune 5 Booked: एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीची तीन लाख रुपयांना विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अल्पवयीन परदेशी मुलीची तब्बल तीन लाख रूपयांना विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही विक्री पुण्यातील तुळशीबाग परिसरातील एका खोलीत करण्यात येत होती.

परदेशी मुलीला जबरदस्तीने खोलीत डांबून ठेवलं होतं. तसेच तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होते. मुलीला पोलिसांची धमकीही देण्यात आली होती. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चंपा असे परदेशी महिलेचे नाव आहे. ती बांगलादेशातील रहिवासी असल्याची माहिती आहे. काही आरोपींनी मुलीला एका खोलीत डांबून ठेवलं. "तू परदेशी नागरिक आहेस, खोलीबाहेर गेलीस तर, पोलीस तुझ्यावर कारवाई करतील", अशी धमकी तिला देण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे ही विक्री पुण्यातील तुळशीबाग परिसरातील एका खोलीत करण्यात येत होती. नंतर तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होते.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तुळशीबागेत धाव घेतली. तसेच आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका केली. या प्रकरणी आरोपी फरासखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

आरोपींनी आणखी कुणा मुलीची अशी विक्री केली आहे का? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे मानव तस्करीचा घाणेरडा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT