High Tach Copy In Police Recruitment Exam Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police Bharati: कानात ब्लुटुथ अन् शर्टावर कॅमेरा लावून कॉपी, पोलीस भरती परीक्षेत मराठवाडयातील ‘हाय-टेक’ रॅकेटचा पर्दाफाश

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पोलीस भरती (Police Bharati) परीक्षेमध्ये हायटेक (high tech) साधनांचा वापर करुन कॉपी करण्याच्या अनेक घटना आतापर्यंत राज्यामध्ये उघड झाल्या आहेत. अशामध्ये आता नुकताच पुण्यातील सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये पार पडलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १९ च्या शिपाई भरती परीक्षेतही हायटेक साधनाचा वापर करुन कॉपी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी (Pune Police) पर्दाफाश केला आहे. कानात ब्लुटुथ आणि शर्टाला कॅमेरा लावून या टोळीने कॉपी केली असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली या ठिकाणच्या परीक्षा गैरव्यवहार करणाऱ्या आरोपींनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १९ च्या शिपाई भरती परीक्षेत गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्यांनी कॉपी करण्यासाठी हायटेक साधनांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. पण पोलीसांनी संबंधित गैरव्यवहार होण्यापूर्वीच या प्रकारातील आरोपींचा माग काढून परीक्षेदरम्यान त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून पोलिसांनी हे रॅकेट उघड केले आहे. या प्रकरणात पुणे, मुंबईतील परीक्षा गैरव्यवहारात समाविष्ट असलेल्या १० जणांना देखील अटक करण्यात आली आहे.

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १९ च्या शिपाई भरती परीक्षेत राज्यभरातील तब्बल साडेआठ हजार विद्यार्थी बसलेले होते. मात्र या लेखी परीक्षेवेळी आरोपी योगेश रामसिंग गुसिंगे, सागर संजय सुलाने , योगेश सुर्यभान जाधव, लखन उदलसिंग नायमने यांनी गैरप्रकार करुन परीक्षेत कॉपी करुन उत्तीर्ण होऊन पोलीस शिपाई या पदाची नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने हायटेक साधनांचा वापर केला. या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी या कारवईदरम्यान अटक केलेल्या उमेदवारांना प्रतिम गुसिंगे, अर्जुन रजपुत, अण्णा आणि इतर काही जणांनी कॉपी करण्यासाठी मदत केली. या सर्वांनी सिमकार्ड, मोबाईल डिव्हाईस, जीएसएम बॉक्स डिव्हाईस, कॅप, एअरबड डिव्हाईस अशी इलेक्ट्रॉनिक्स अत्याधूनिक साधने स्वत: जवळ ठेवून लेखी परीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपींविरोधात अहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस बल गटाचे पोलीस उपनिरीक्षक अजित कुंभार यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT