Pune Police  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यात बांगलादेशींवर पुन्हा कारवाई, 6 महिलांसह अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात

Pune Police Action on Bangladeshi Women : सामजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

पुणे पोलिसांना पुण्यात अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. 6 महिलांसह एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सामजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे.

बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करण्यासाठी या महिला तेथे राहत होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सगळे बांगलादेशी नागरिक अवैधरित्या पुण्यात राहत होते. महिन्याभरात पुणे पोलिसांची दुसरी मोठी कारवाई आहे. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी बुधवार पेठ परिसरांमधूनच 19 बांगलादेशींना अटक केली होती. यामध्ये 10 बांगलादेशी महिला आणि 9 पुरुषांचा समावेश होता. बुधवार पेठ परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून हे 19 बांगलादेशी अवैध पद्धतीने वास्तव्य करत होते.

बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकालाही यावेळी अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

Maharashtra News Live Update: यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

SCROLL FOR NEXT