Mumbai Crime News : नवा संसार सुरु होण्याआधीच मोडला, कानशिलात मारल्यानं बायको बेशुद्ध, मृत्यू झाल्याचं समजून तरुणाची आत्महत्या

Wadala News : मुंबईतील वडाळा परिसरात ही घटना घडली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
Wadala News
Wadala News Saam TV
Published On

Mumbai News :

पत्नीसोबत झालेल्या वादानंतर २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच तरुणाचं लग्न झालं होतं. मुंबईतील वडाळा परिसरात ही घटना घडली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत देवेंद्र असं मृत तरुणाचं नाव आहे. सोमवारी रणजीतचं आपल्या पत्नीसोबत क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. या वादात रणजीतने पत्नीच्या कानशिलात लगावली. मात्र जोरदार फटका बसल्याने पत्नी खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. (Crime News)

Wadala News
Pune PMPL News: सुट्ट्या पैशांची चिंता मिटली... PMPL बसेसमध्ये सुरू होणार युपीआय पेमेंट सुविधा

व्हिडीओ पाहा

मात्र पत्नीचा मारहाणीत मृत्यू झाला असं रणजीतला वाटलं. त्यावेळी तरुणाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी जेव्हा शुद्धीवर आली त्यावेळी रणजीन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नीने रणजीतला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Latest Marathi News)

Wadala News
Nipah Virus News : कोरोनानंतर घातक निपाह व्हायरसचा धोका, केरळमध्ये दोघांचा मृत्यू; अलर्ट जारी

टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. याप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com