Gangster Nilesh Ghaywal faces major trouble as his passport gets officially revoked after Pune Police investigation. Saam tv
मुंबई/पुणे

Pune Nilesh Ghaywal Case: निलेश घायवळला मोठा झटका; पासपोर्ट अखेर रद्द

Gangster Nilesh Ghaywal Passport: पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला. त्यानंतर पासपोर्ट रद्द करण्यात आलाय.

Bharat Jadhav

  • निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द.

  • पुणे पोलिसांच्या अहवालानंतर पासपोर्ट कार्यालयानं ही कारवाई केली आहे.

  • घायवळनं बनावट नाव आणि पत्त्यावर पासपोर्ट मिळवला होता.

निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आलाय. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी करण्यात आलाय. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळबाबत अहवाल सादर केला होता. त्यानंतर पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील कोथरुडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ चर्चेत आला होता.

विशेष म्हणजे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याविषयी पोलीस प्रशासनावरच ताशेरे ओढले जात होते. घायवळने अहिल्यानगरमधील आपल्या गावाच्या पत्तावर त्याने पासपोर्ट काढला. पासपोर्टसाठी त्याने आपल्या आडनावात देखील बदल होता. 'घायवळ' ऐवजी 'गायवळ' नावाची कागदपत्रे त्याने सादर केली होती,असं पोलीस तपासात उघड झालं होतं.

गायवळ नावावर कोणतेही गुन्हेगारी कृत्य नोंद नसल्याने पोलिसांनी त्याला एनओसी दिलं. त्यानंतर पासपोर्ट ऑफिसला आपल्यावर गुन्हा दाखल नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र त्याने दिले. यामुळे निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला. आता मात्र परदेशात पळून गेलेल्या घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेत.

सर्व खोटी कागदपत्रे

पासपोर्ट मिळवण्यासाठी त्याने नावात बदल केला. पोलीस रिकोर्डमध्ये त्याचे नाव निलेश घायवळ आहे. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी त्याने निलेशने गायवळ नावाने आधारकार्ड काढलं होतं. गायवळ नावाचे गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याने पासपोर्ट मिळालं. तसेच पोलिसांना देखील ऑनलाईन यंत्रणेत गायवळच्या नावावर गुन्हे दाखलची माहिती मिळाली नाही.

दरम्यान घायवळने बनावट कागदपत्रे, माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळविल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट विभागातील अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुणे पोलिसांनी तेथे त्याने दिलेल्या त्या आहिल्यानगरच्या पत्त्यावर छापा टाकला. मात्र पासपोर्ट मिळविण्यासाठी दिलेला पत्ता खोटा असल्याचे उघडकीस आले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

Moisturizer For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणता मॉइश्चरायझर आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: तेल्हारा नगरपालिकेत वंचित आणि शेतकरी पॅनलसह तेल्हारा विकासमंच'मध्ये युतीची घोषणा

कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

SCROLL FOR NEXT