Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : भाईंच्या दहशतीला कायद्याची काठी; डॉन, भाईंची निघणार वरात

Crime News : पुण्यात गुंडगिरी केली तर इभ्रत वेशीवर टांगण्याची सगळी सोय पोलिसांनी केलीय. अजितदादांनी काही दिवसांपूर्वीच गुंडांना इशारा दिला होता. मात्र काही गुंडांनी तो गांभीर्यानं घेतला नाही. त्यामुळे पोलिसांनी नेमकं या गुंडांचं काय केलं? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Tanmay Tillu

Pune News : शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे.या घटनांवर आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आता पुणे पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरूवात केलीए. दहशत पसरवणाऱ्या भागांमध्येच गुंडांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांकडून त्यांची धिंड काढली जातेय.. ज्या ठिकाणी गुन्हा केला, त्याच ठिकाणी गुंडांची वरात, धिंड काढण्याचा पॅटर्न पुणे पोलिसांनी सुरू केलाय.

तरीही काही गुंड याला जुमानत नसल्याचं चित्र आहे. त्यांना आता पुणे पोलिसांनी सज्जड दम दिला आहे. महिलांची छेडछाड काढाल, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू असा दमच पोलिसांनी गुडांना दिला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुणे पोलिसांनी स्वयंघोषित भाईंची, गुंडांची भर चौकात वरात काढायला सुरवात केली आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांनाच कायदा सुव्यवस्थेवरून तंबी दिली होती.

नुकतीच येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर परिसरात 12 रिक्षा आणि दोन दुचाकींची तोडफोड करणाऱ्या सराईताला येरवडा पोलिसांनी अटक केली. ज्या भागात गुंडाने वाहनांची तोडफोड केली. त्याच भागात पोलिसांनी त्याची धिंड काढली.

गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. किती घटना घडल्यात पाहूया.

आकडेवारी - सन 2024 - सन 2025

दाखल - 83 - 09

उघड - 75 - 06

अटक आरोपी - 156 - 09

विधीसंघर्षीत बालक - 52 - 06

पाहिजे आरोपी - 04 - 00

पिंपरी चिंचवडसह पुणे कोयता गँगनं बदनाम झालंय. शहरातील टोळी युद्धांनी मुंबईच्या टोळीयुद्धांनाही मागे टाकलंय. टोळ्या आपापसात मारामाऱ्या करुन खून पाडतात आणि पोलिस बघ्याच्या भूमिकेत असतात. मात्र आता राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत गृहमंत्री फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादांनी पोलिसांना खडा आदेश दिल्यानं पोलिसांनीही आरोपींची धिंड काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र यामुळे खरोऱच गुंडदादांना वचक बसणार की पुन्हा परिस्थिती जैसे थे च राहणार हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT