पुणे पोलिस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्याने कारवाई
शुभम विजय सूर्वे, योगेश भागचंद्र एकशिंगे आणि अभिजीत अनिल शिंदे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे
गुन्हेगारांशी जवळीक, बेजबाबदार वर्तन आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका
पुणे पोलिस दलातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ३ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. या पोलिसांचे निलंबन करण्यात आल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या पोलिसांची चौकशी सुरू आहे.
कर्तव्यात बेफिकिरी आणि बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत पुणे शहर पोलिस दलातील या ३ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. शुभम विजय सूर्वे, योगेश भागचंद्र एकशिंगे आणि अभिजीत अनिल शिंदे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पुणे पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत पुणे पोलिस दलातील ३ कर्मचारी गेले होते. आरोपीशी जवळीक ठेवणे आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे पोलिस दलाच्या शिस्तीला धरून नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या पोलिसांबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून त्यांची सविस्तर चौकशी करण्यात आली.
या चौकशीनंतर तयार करण्यात आलेला अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला. या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात आली. त्यानंतर अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी या तिन्ही पोलिसांचे तडकाफडकी निलंबन केले. याबाबत शुक्रवारी आदेश जारी करण्यात आले. गुन्हेगारांशी जवळीक, बेजबाबदार वर्तन, कामात कसूर आणि पोलिस दलाची शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.