Pune PMPML Bus Accident Saam TV
मुंबई/पुणे

Bus Accident : सिटी बसने दुचाकीस्वारासह अनेक वाहनांना उडवलं; भीषण अपघाताचा VIDEO समोर

पुण्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यात पीएमपीएमएल बसने दुचाकीस्वारासह अनेक गाड्यांना धडक दिली.

Dnyaneshwar Choutmal

Pune PMPML Bus Accident : पुण्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यात पीएमपीएमएल बसने दुचाकीस्वारासह अनेक गाड्यांना धडक दिली. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. बुधवारी (28 डिसेंबर) रात्री ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातग्रस्त बसचा व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात (Bus Accident) झाला असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. पुण्यातील वाकडेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रवाशांना घेऊन जाणारी पीएमपीएमएल बस वाकडेवाडी परिसरात आली.

बस सुसाट वेगात असताना अचानक बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे बसने समोरून जाणाऱ्या दोन दुचाकींसह रिक्षा, टेम्पो आणि एका ४०७ गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बसने दुचाकीस्वाराला २०० ते ३०० फूट फरफटत नेलं. तसेच समोरून जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. याशिवाय कारच्या पाठीमागच्या सीटवर बसलेली महिला देखील जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुचाकीस्वार व्यक्तीवर जहांगीर तर कारमधील महिलेवर संचेती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT