गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील एम्पायर इस्टेट सोसायटीजवळील सेंट मदर टेरेसा उड्डाणपुलाखाली एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील बीआरटी बस थांब्याकडे जाणाऱ्या जिन्यावर एका ४२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सिकंदर मोहम्मद शेख (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास सिकंदर शेख याने जिन्यापाशी असलेल्या लाईटच्या केबलला गळफास लावून आपले आयुष्य संपवले. घटनास्थळी पोलिसांना रुग्णालयाशी संबंधित कागदपत्रांची एक फाईल आढळून आली आहे. त्यामुळे मृत सिकंदर शेख हा कुठल्या आजारपणामुळे किंवा मानसिक तणावाखाली होता का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनासाठी वायसीएम (YCM) रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पिंपरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, भरवस्तीत आणि नेहमी वर्दळ असलेल्या बीआरटी बसथांब्याच्या जिन्यावर अशा प्रकारे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी हा प्रकार सर्वात आधी पाहिला आणि तातडीने याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. प्राथमिक अंदाजानुसार, मृत सिकंदर शेख हा गंभीर आजारपणामुळे त्रस्त होता आणि त्यातून आलेल्या नैराश्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेली वैद्यकीय कागदपत्रांची फाईल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पिंपरी पोलीस अधिक तपास करत असून, मृतकाच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.