Pune PDCC Bank  social media
मुंबई/पुणे

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

PDCC Bank : रोहित पवार यांनीही वेल्हा PDCC बँकेचा रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानुसार भरारी पथकाने खातरजमा करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड

पुणे: पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आलीय. काल रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्याप्रकरणी २०२४ च्या आदेशानुसार आचारसंहिता भंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार रोहित पवार यांनीही या बँकेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत प्रश्न उपस्थित केले होते.

निवडणूक भरारी पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री PDCC बँकेत ४० ते ५० लोक रात्री संशयितरित्या फिरत होते, निदर्शनात आले. त्यानंतर बँक मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान रोहित पवार यांनीही वेल्हा PDCC बँकेचा रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानुसार भरारी पथकाने खातरजमा करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा आज पार पडला. या टप्प्यात राज्यातील सर्वात लक्षवेधी आणि महत्त्वाची अशी बारामतीती मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २३ लाख ७२ हजार आहे. दरम्यान बारामती तालुक्यात विरोधकांकडून पैसे वाटून मतदारांना विकत घेण्यात येत असल्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला होता.

तसेच पीडीसीसी बँकेच्या वेल्हे शाखेच्या उशिरा रात्रीपर्यंत चालू राहण्यावरून आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. पीडीसीसी बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडल असावं. रात्रीचे १२ वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावे, निवडणूक आयोग दिसतंय ना? असा प्रश्न रोहित पवार यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारला होता. रोहित पवार यांच्या तक्राराची खात्रीरजमा करत निवडणूक आयोगाने आज बँकेवर कारवाई करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: e-KYC ची मुदत 30 एप्रिलला संपली; 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र

HSC Result date: बारावीचा निकाल उद्या, या अधिकृत लिंकवर ऑनलाइन पाहता येणार, गुणपत्रिका डाउनलोड कशी कराल?

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत कोरेगाव शहरात तीन शाखांचे आणि एका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

Riteish Deshmukh: तुळजाभवानीच्या चरणी देशमुख कुटुंब! 'राजा शिवाजी'च्या यशासाठी रितेश-जेनेलियाने देवीचे दर्शन घेतले

SCROLL FOR NEXT