Pune Parrot News Saam TV
मुंबई/पुणे

Pune: पोपटाला पिंजऱ्यात ठेवाल तर जावं लागेल पोलिसांच्या पिंजऱ्यात! वर्षभराच्या शिक्षेसह दंडही भरावा लागणार

Pune Parrot News: एकदा पिंजराबंद झालेला पोपट पुन्हा निसर्गात सामावू शकत नाही. त्याच्या पंखातील बळ कमी होऊन त्याची वाढ खुंटते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: पक्षीप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर पक्षीप्रेमी असाल अन् तुम्ही घरात पोपट (Parrot) पाळत असाल तर तुम्हाला तुरुंगवारी आणि दंड होऊ शकतो. होय, पुण्यात (Pune) आता पोपट पाळणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. घरात पक्षी आणि प्राणी पाळण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, पोपट पाळण्याला बंदीच आहे. अनेकांना ही बाब माहिती नसेल. पण, आता पोपटाला पिंजऱ्यात ठेवणं तुम्हाला कायद्याच्या पिंजऱ्यात उभं करु शकतं. (Pune Parrot News)

हे देखील पाहा -

पोपटांची पिल्ले पकडून त्यांची विक्री करणारे रॅकेट (Racket) राज्यात मोठे आहे. त्यामुळे पोपट पाळणे हा गुन्हा असून, त्या विरोधात 50 हजार रुपयांचा दंड आणि एक वर्षाच्या कारावासाची तरतूद वन्यजीव अधिनियम कायद्यात (The Wild Life Protection Act, 1972) करण्यात आली आहे. शिकारी झाडाच्या ढोलीतील पोपटाची पिले पळवून त्यांच्या विक्रीचा व्यवसाय करतात. किमान पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त रकमेला विक्री केली पोपटांच्या पिल्लांची विक्री केली जाते. (pune Parrot news saam tv)

एकदा पिंजराबंद झालेला पोपट पुन्हा निसर्गात सामावू शकत नाही. त्याच्या पंखातील बळ कमी होऊन त्याची वाढ खुंटते. पिंजराबंद असलेला पोपट कालांतराने व्याधीग्रस्त होतो आणि लवकरच मृत्युमुखी पडतो, त्यामुळे पोपट पाळणं कायद्याने गुन्हा आहे. पोपटाला पिंजऱ्यात ठेवल्याचे आढळल्यास मालकालाही पोलिसांच्या पिंजऱ्यात जावे लागू शकते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पोपटामुळे त्याच्या मालकावर गुन्हा दाखल झाला होता. पोपट वारंवार शिट्टी मारत असल्याने पुण्यात पोपटाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शेजाऱ्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोपटामुळे मालकावर दाखल झालेला गुन्हा हे प्रकरण चर्चेत आलं होतं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lasuni Khakhra: घरीच १० मिनिटांत बनवा चटपटीत लसूणी खाखरा, चहाची चव वाढवेल

भाजपच्या उमेदवाराला अडवल्याने केंद्रीय मंत्री आणि पोलिसांमध्ये बाचाबाची|VIDEO

High BP: उच्च रक्तदाब हळूहळू शरीराला पोखरतो; प्रवासात हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या ४ घातक सवयी जाणून घ्या

Maharashtra Nagar Parishad Live : बोगस मतदान करताना चार-पाच जणांना पकडलं, बुलडाण्यात गोंधळ

Maharashtra Live News Update: कागल नगरपालिका मतदान केंद्रावर गोंधळ

SCROLL FOR NEXT