Crime News,Pune
Crime News,Pune SaamTv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात तरुणांचा धुडगूस सुरूच! दोन गटात मारामारी, तुफान दगडफेक करत घातला राडा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगचा सुरू असलेला धुडगूस अद्याप सुरूच आहे. हातात कोयते घेवून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना धमकावणे, दहशत माजवण्याचे प्रकार घडत आहेत.

पुण्यातील येरवडा भागात अशीच घटना समोर आली असून यामध्ये तुफान दगडफेक आणि तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. (Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुर्ववैमन्यसातून पुण्यातील येरवडा भागात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणांनी तुफान दगडफेक आणि दारूच्या बाटल्या घरावर फोडून रस्त्यावर गोंधळ घातला.

इतकेच नव्हेतर या तरुणांनी हातात तलवारी,कोयते नाचवत परिसरात दहशत निर्माण केली आणि एकाच्या डोक्यात कोयता मारून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. अब्दुल्ला आमीरउल्ला खान (वय.१९,रा.लक्ष्मीनगर, येरवडा) असे कोयत्याचा हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न करणे,बेकायदा हत्यारे बाळगणे,दहशत माजविणे अशा कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, “फिर्यादीचा मोबाईल गहाळ झाल्याने मित्र महेश मिश्रा आणि आयुष यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. तक्रार देऊन तिघे दुचाकीवरून घरी येत असताना गजराज हेल्थ क्लब समोरून जात असताना ओळखीचे अंश पुंडे उर्फ आनशा ,सुरेश कुडे उर्फ ममडया ,नाग्या आणि यश पात्रे उर्फ काळ्या यांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला.

यावेळी आनशा नावाच्या मुलाने "या कुत्राला आज सोडायचे नाही," असे म्हणून त्याने त्याच्या हातातील कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने खान यांच्या डोक्यात दोन वेळा वार केले.

या हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत थेट येरवडा पोलीस ठाणे गाठले. ही मारहाण झाल्याचे समजताच दोन टोळक्यांनी एकमेकांवर आणि परिसरातील घरांवर ,रस्त्यावर तुफान दगडफेक करून दारूच्या बाटल्या फोडल्या. दगडफेकीत रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. (Pune)

दरम्यान, पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत असून यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT