Supreme Court
Supreme CourtSaam Tv

BBC Documentary: 'डॉक्यूमेंट्रीवर घातलेली बंदी असंवैधानिक', सर्वोच्च न्यायालयात 'या' तारखेला होणार सुनावणी

६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात बीबीसी डॉक्यूमेंट्रीवर सुनावणी होणार आहे.

शिवाजी काळे

Supreme Court: बीबीसी डॉक्यूमेंट्री वादावर सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. मनोहर लाल शर्मा यांनी याबाबत सर्वोच्च न्ययालयात धाव घेतली आहे. तसेच लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात बीबीसी डॉक्यूमेंट्रीवर सुनावणी होणार आहे. (Latest BBC Documentary News)

बीबीसी डॉक्यूमेंट्रीवरील भारतातील बंदी उठवावी आशी मागणी याचिकाकर्ते एमएल शर्मा यांनी केली आहे. तसेच बीबीसी डॉक्यूमेंट्रीवर घातलेली बंदी असंवैधानिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Supreme Court
Pune By-Election: महाविकास आघाडीत मतभेद? कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाची उडी

भारतात २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या दंगली संदर्भात बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवर भारत सरकारने आक्षेप घेतला आहे. बीबीसीच्या या डॉक्यूमेंट्रीला भारतात बंदी घालण्यात आली आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी विरोध करत निदर्शने करण्यात आलीत.

Supreme Court
Ashish Shelar: 'BBC च्या बोगस डॉक्यूमेंट्रीचा शो कराल तर ...' आशिष शेलारांचा टाटा इंस्टिट्यूटला इशारा

काही महाविद्यालयांमध्ये या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला. या डॉक्यूमेंट्रीचं जेएनयूमध्ये स्क्रिनिंग सुरू होतं त्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. डॉक्यूमेंट्री सुरू असताना अचानक वीज गेली. ही वीज विद्यापीठाने कट केली, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी दगडफेकही करण्यात आली.

Supreme Court
BBC Documentary In TISS : 200 विद्यार्थ्यांनी वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्री पाहिली; 'पीएसएफ' विद्यार्थी संघटनेने केला दावा

भारतात या डॉक्यूमेंट्रीवर बंदी घातल्यानंतर जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील याचा विरोध केला. डॉक्यूमेंट्री दाखवण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. मात्र प्रशासनाच्या परवानगीशिवाय तसं शक्य नसल्याचं विद्यापीठ प्रशासनाचं म्हणणं आहे.

दरम्यान मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्येही यावरुन गदारोळ झाला. येथील २०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॅपटॉपवर ही डॉक्यूमेंट्री पाहिल्याचा दावा प्रोग्रेसिव्ह स्टुडंट फोरम या विद्यार्थी संघटनेने केला. देशात डॉक्यूमेंट्रीवर सुरू असलेला गदारोळ लक्षात घेता आता सर्वोच्च न्यायालयात कोणता निर्णय घेतला जाईल याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com