pune crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: महिलांच्या बाथरूममध्ये डोकावून पाहायचा; तरूणीचं लक्ष गेलं अन् रंगेहाथ पकडलं

Young woman Catches Man Trying to Sneak Peek in women Bathroom: पुणे शहरातील विमाननगर परिसरातील एका खाजगी कंपनीत महिलांच्या स्वच्छतागृहात डोकावणाऱ्या सफाई कामगाराचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Bhagyashree Kamble

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे शहरातील विमाननगर परिसरातील एका खाजगी कंपनीत महिलांच्या स्वच्छतागृहात डोकावणाऱ्या सफाई कामगाराचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका तरुणीने प्रसंगावधान राखत आरोपीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल दुकाळे (वय वर्ष २५) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी खाजगी कंपनीतील स्वच्छतागृहात जाऊन तरूणींना लपून पाहायचा. एका २३ वर्षीय तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तरूणी स्वच्छतागृहात गेली. यावेळी स्वच्छतागृहातील लाईट गेल्याचं आढळले.

लाईट सुरू केल्यानंतर तिला स्वच्छतागृहात कुणीतरी लपल्याचे लक्षात आले. दुकाळे हा आत लपून बसलेला होता आणि डोकावून पाहत असल्याचे दिसताच तरुणीने आरडाओरडा केला. त्यानंतर तत्काळ अन्य कर्मचारी तिथे पोहोचले आणि दुकाळेला पकडून विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी अनिल दुकाळे मागील ३–४ महिन्यांपासून त्या कंपनीत सफाई कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याची चौकशी केली. पोलिसांनी आरोपीविरोधात कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे करीत आहेत. या घटनेनंतर खासगी कंपनीत खळबळ उडाली असून, कंपनीतील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire : घरातील फ्रीजचा अचानक स्फोट, ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू, मुंबईतील भयानक घटना

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Success Story: मराठी माध्यमातून शिक्षण, आधी MBBS मग UPSC; सोलापूरचे भगवंत पवार झाले वैद्यकीय अधिकारी

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

SCROLL FOR NEXT