Navi Mumbai Crime
Navi Mumbai Crimesamm tv

स्कूल बस चालकाकडून ४ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; प्रायव्हेट पार्टमध्ये घातला पेन; नवी मुंबईत खळबळ

4 Year Old Boy Physically Assaulted by Bus Driver: एका स्कूल बस ड्रायव्हरने ४ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Published on

नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका स्कूल बस ड्रायव्हरने ४ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती पालकांना मिळाल्यानंतर त्यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एनआयआर कोस्टल पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबईच्या नेरूळच्या एका शाळतील ४ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला. सुजित दास (वय वर्ष २५) असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलाच्या शाळेतच बस चालक म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी बस चालक मुलांना घेऊन येत होता. यादरम्यान, बसमध्ये पीडित चिमुकलाही होता. चिमुकल्यासोबत त्याने दुष्कृत केलं. तसेच त्याच्या प्रायव्हेट पार्ट पेनसारखी एखादी वस्तू घातली.

Navi Mumbai Crime
Dombivli: देवपूजा करताना अनर्थ! दिव्याची वात अंगावर पडली, महिलेचा होरपळून मृत्यू

चिमुकला घरी परतल्यानंतर तो रडू लागला. पालकांनी चिमुकल्याला जवळ घेऊन विचारले असता, त्याने आपबिती सांगितली. गुप्तांगात पेनसारखी गोष्टी घातली असल्याची माहिती चिमुकल्याने दिली. चिमुकल्याने सांगितलेल्या आपबितीनंतर संतप्त पालकांनी थेट नेरूळ पोलीस स्टेशन गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

Navi Mumbai Crime
डॉ. वळसंगकरांनंतर आणखी एका डॉक्टरने आयुष्य संपवलं, भाड्याच्या घरात गळा चिरून आत्महत्या | Solapur

चिमुकल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एनआरआय कोस्टल पोलिसांनी २५ वर्षीय आरोपीला अटक केली. तसेच आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com