Pune News woman passenger died after a tree fell on rickshaw Sahakar Nagar Area Shocking incident Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात धावत्या रिक्षावर अचानक झाड कोसळलं; महिलेचा जागीच मृत्यू, चिमुकला थोडक्यात बचावला

Pune Latest News: पुणे शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. सहकारनगर परिसरातील मुक्तांगण शाळेजवळ धावत्या रिक्षावर अचानक झाड कोसळलं.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Marathi News: पुणे शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. सहकारनगर परिसरातील मुक्तांगण शाळेजवळ धावत्या रिक्षावर अचानक झाड कोसळलं. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, रिक्षाचालक जखमी झाला आहे. सुदैवाने या घटनेत रिक्षातील ३ वर्षीय बालकासह अन्य ३ महिला बचावल्या आहेत. (Latest Marathi News)

थरकाप उडवणारी ही घटना सोमवारी (१२ जून) सायंकाळच्या सुमारास घडली. लीला विश्वनाथ काकडे (वय ५०, रा. जांभूळवाडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ महिला एका लहान मुलासह सोमवारी सायंकाळच्या सुमारास रिक्षाने प्रवास करीत होत्या. रिक्षा सहकारनगर (Pune News) परिसरात आली असता रस्त्यालगत असणारे झाड अचानक रिक्षावर कोसळले.

यात रिक्षातील लीला काकडे या महिलेच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर, रिक्षातील अन्य तीन महिला आणि मुलगा सुरक्षित आहे. लहान मुलाचे आणि रिक्षाचालकाचे नाव समजू शकले नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू व्हॅनसह घटनास्थळी धाव घेतली.

त्यावेळी झाड रिक्षावर पडून एक महिला जखमी अवस्थेत अडकली होती. रिक्षामधील अन्य तीन महिला आणि लहान मुलाला स्थानिक नागरिकांनी तातडीने बाहेर काढले. तसेच, जवानांनी गंभीर जखमी झालेल्या महिलेची सुटका करून ससून रुग्णालयात दाखल केले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT