Pune Ruby Hall Clinic Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: महिला रुग्णाचा मृतदेह अचानक गायब, रुबी हॉल क्लिनिकमधील धक्कादायक प्रकार; पुण्यात खळबळ

Pune Ruby Hall Clinic: पुण्यातली रुबी हॉल क्लिनिकमधून एका महिला रुग्णाचा मृतदेह गायब झाला. यामुळे नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमधून महिला रुग्णाचा मृतदेह गायब झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला

  • उपचारादरम्यान ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

  • मृतदेह देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ असल्याचा दावा

  • नातेवाईकांकडून हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाईची मागणी

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील नामांकित रुबी हॉल हॉस्पिटल चर्चेत आले आहे. या हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिलमधील ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह गायब झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून हॉस्पिटल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सोलापुरातील अकलूज येथील रहिवासी सुनीता भगत (वय ५५ वर्षे) यांना उपचारासाठी १८ जानेवारीला पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच १९ तारखेला सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना कळवले. मृत्यूनंतर नेहमीच्या प्रक्रियेनुसार मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र मृतदेह देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

नातेवाईकांचा दावा आहे की, बराच वेळ प्रतीक्षा करूनही मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला नाही. त्यानंतर अचानकपणे सुनीता भगत यांचा मृतदेह एका वेगळ्याच रुग्णवाहिकेतून त्यांच्या समोर बाहेरून आणण्यात आला. हा प्रकार पाहून नातेवाईक चांगलेच संतप्त झाले. मृतदेह नेमका कुठे होता?, तो दुसऱ्या रुग्णवाहिकेतून का आणण्यात आला?, याबाबत प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेसह मृत्यूनंतरच्या प्रक्रियेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. मात्र याबाबत लिखित तक्रार आलेली आहे त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहितीसह सहाय्यक पोलीस उपयुक्त यांनी दिली . हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT