pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात सोसायटीमध्ये स्फोट; पोलिसांनी घेतले संशयिताला ताब्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील भवानी पेठ मधील विशाल सोसायटीमध्ये एक संशयित स्फोट झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

गोपाळ मोटघरे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील (Pune) भवानी पेठ मधील विशाल सोसायटीमध्ये एक संशयित स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे (Blast) पुणे शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

भवानी पेठेतील विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३०६ मध्ये हा संशयित स्फोट झाला आहे. स्फोटाच्या तीव्रतेने फ्लॅटमधील खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. फ्लॅट मध्ये झालेला स्फोट इतका भीषण होता की, या स्फोटचा आवाज संपूर्ण सोसायटीमध्ये ऐकायला गेला. प्रचंड आवाजामुळे सोसायटीमध्ये रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी राशद शेख संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

दोन-तीन तासांपासून पुणे पोलीसांकडून राशद शेख या संशियत व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडे काही सिमकार्ड आणि पासपोर्ट सापडले आहेत. हा संशयित राशद शेख दहा वर्षापासून या सोसायटीत राहत आहे. तर या सोसायटीमध्ये एकटाच राहत असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन मुस्ताक अहमद यांनी दिली आहे. राशद शेख हा इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर असून तो मूळचा मुंबईचा आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून तो विशाल सोसायटीमध्ये राहतोय. राशद शेख हा सोसायटी मधील सदनिकेत इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्तीचे काम करत असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन मुस्ताक अहमद यांनी दिली आहे.

दरम्यान, या स्फोटावर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे.'विशाल सोसायटीत राशद शेख हा आरोपी आपल्या वाशिंग मशीनची दुरुस्ती करत होता. त्यावेळी फायर गॅस टॉर्चचा अतिरिक्त फ्लो सोडल्या गेल्याने हा स्फोट झाला अशी शक्यता आहे, अशी माहिती समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beautiful Railway Station: देशातील ९ ऐतिहासिक आणि आकर्षक रेल्वे स्थानके, पर्यटकांसाठी आहेत खूप खास

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

SCROLL FOR NEXT