Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : राहत्या घरात दांपत्याची आत्महत्या, गळफास घेऊन जीवन संपवलं; कारण...

Pune News In Marathi : पुण्याच्या वाघोली आव्हाळवाडी येथे एका दांपत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : पुण्यातील वाघोली परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोलीजवळ आव्हाळवाडी येथे एका व्यक्तीने पत्नीसह राहत्या घरात गळफास घेतला. दोन्ही आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडीत पती-पत्नीने घरात आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. नागनाथ वारुळे (वयवर्ष ४३) आणि त्यांची पत्नी उज्वला वारुळे (वयवर्ष ४०) असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे. सोमवारी रात्री त्यांनी आत्महत्या केली, सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

नागनाथ वारुळे आणि त्यांची पत्नी उज्वला या वाघोली येथील दैनंदिन बाजारात फळ विक्री करण्याचे काम करत होते. दोघेही काबाडकष्ट करत होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. वाघोली पोलीस मृत्यूमागील खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

आर्थिक अडचणींमुळे फळ विकण्याचे काम करणाऱ्या दांपत्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारी (११ मे) रोजी रात्री दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (१२ मे) रोजी ही घटना समोर आली. याबात वाघोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:अण्णा हजारे उपचारासाठी मुंबईला हलवले

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT