Pune News | Vasant More Cried in Press Conference After Resignation From Raj Thackeray's MNS Saam Tv
मुंबई/पुणे

Vasant More Cried: ठाकरेंची साथ सोडताना वसंत तात्यांच्या डोळ्यात अश्रू, पत्रकार परिषदेत ढसढसा रडले; राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १२ मार्च २०२४

Vasant More Press Conference:

पुण्यातील फायरबँड नेते वसंत मोरे यांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. साहेब मला माफ करा असे म्हणत वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहीत मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले वसंत मोरे?

"गेली २५ वर्ष शिवसेनेमध्ये राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) काम केलं. राज ठाकरेंसोबत करियर केलं. आज मनसेच्या सर्व पदांचा राजनामा दिला आहे. मी लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे म्हणल्यानंतर मनसेमधील पुण्यातील यादी वाढत गेली. मनसेची पुण्यातील परिस्थिती नाजूक आहे. मनसे लोकसभा लढू शकत नाही, माझ्यावर अन्याय झाला, मग माझा कडेलोट झाला..." असे वसंत मोरे (Vasant More) यावेळी म्हणाले.

"माझा वाद राज ठाकरे यांच्याशी नाही. मनसेशी (MNS) नाही. चुकीच्या लोकांच्या हाती शहर दिले. मला अनेकजण थांबवत होते. माझ्या कार्यकर्त्यांवर कारवाया होत होत्या. राज ठाकरे यांच्या मनातलं नाव हटवण्याचे काम कोअर कमिटीने केलं आहे. पक्षाचे वातावरण शहरात चांगले असताना इथले पदाधिकारी निगेटिव्ह आहेत, मी मनसेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, आता बाकी इच्छुक असणाऱ्यांना उमेदवारी द्यावी..." असे वसंत मोरे म्हणाले.

"साहेब मुंबईला असतात. पुण्यातील अनेक कार्यक्रमात मला डावलले जातं. मी पक्षात दहशतवादी आहे का? माझ्याबरोबर अनेक जण उभे राहायला घाबरतात. मला ऑफर्स खूप आहेत, कुठे जाणार हे भविष्यात कळेल येणाऱ्या दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेल," असे महत्वाचे विधान ही वसंत मोरे यांनी केले. (Latest Marathi News)

पत्र लिहित ठोकला पक्षाला रामराम!

"पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो.

परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षातर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे, असे म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT