Indapur Kadbanwadi Plan Accident
Indapur Kadbanwadi Plan Accident Saam TV
मुंबई/पुणे

Breaking! इंदापूरमध्ये मक्याच्या शेतात कोसळलं विमान; प्रशिक्षण घेत होती पायलट तरुणी

मंगेश कचरे

पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शिकाऊ विमान (Plane) कोसळलं आहे. माहितीनुसार, इंदापूर (Indapur) तालुक्यातील कडबनवाडी येथे हे विमान कोसळलं आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. (Pune Indapur Todays News)

मात्र विमान चालवत असलेली प्रशिक्षणार्थी वैमानिक युवती जखमी झाली आहे. माहितीनुसार, प्रशिक्षणासाठी वापरले जाणाऱ्या ग्लायडर विमानाने बारामतीहून उड्डाण भरलं होतं. कसरत करत असताना हे विमान अचानक इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे एका मक्क्याच्या शेतात कोसळले.

तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान कोसळले असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून प्रशिक्षणार्थी वैमानिक तरुणी किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान, विमान कोसळल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune Latest News)

जखमी झालेल्या या वैमानिक युवतीला प्राथामिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ग्लायडर विमान चालवताना प्रशिक्षित चालक आणि प्रशिक्षणार्थी असे दोघे विमानात असणे आवश्यक आहे. मात्र, या घटनेत एकटी प्रशिक्षणार्थी तरुणी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाचा पुन्हा तपास होणार

IRCTC Hotel Service : स्टेशनवर 100 रुपयांत मिळणार हॉटेलसारखी रूम; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Amaravati Express Fire : दादर रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेसला आग, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

CBSE Results 2024: प्रतीक्षा संपली! सीबीएसई १० आणि १२ वीचा निकाल कधी लागणार? महत्वाची अपडेट आली समोर

Loksabha Election: प्रसिद्ध गायक नंदेश उमप लोकसभेच्या रिंगणात; ईशान्य मुंबईमधून भरला अर्ज

SCROLL FOR NEXT