Pune Viman Nagar Traffic News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic News : पुणे शहरात वाहतुकीत तात्पुरते बदल; कसा कराल प्रवास? वाचा

Pune Viman Nagar : वाहतुक सुरळीतपणे व्हावी या उद्देशाने विमाननगरमध्ये वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपाचे बदल करण्यात आले आहे. या संदर्भात पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी माहिती दिली आहे.

Yash Shirke

Pune Viman Nagar News : पुणेकरांचा प्रवास सुरक्षित आणि अधिक सुरळीतपणे सुरु राहावा यासाठी पुणे शहरातील विमाननगर वाहतूक विभागाच्या अंतर्गत वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपाचे बदल करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणी वाहतूक विभागाने जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

वाहतुकीत काय अपडेट आहे?

- फिनिक्स मॉल (विमाननगर चौक, जंक्शन) ते सोमनाथ नगर चौक या दरम्यान गोलाकार पद्धतीने वाहतुकीत बदल करण्यासाठी विमाननगर चौक, जंक्शन हे प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत.

- विमाननगरहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी विमाननगर चौकातून डावीकडे वळन घेऊन सोमनाथ नगर चौक येथून यू टर्न घेवून इच्छितस्थळी जावे.

- नगरहून पुण्याकडे येणाऱ्या व विमाननगर फिनिक्स मॉलकडे जाणाऱ्या वाहनांनी अग्निबाज गेट समोरुन यू टर्न घेऊन इच्छितस्थळी जावे.

या आदेशाबाबत काही सूचना किंवा हरकती असल्यास नागरिकांनी १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलीस उपआयुक्तांच्या कार्यालयात लेखी स्वरुपात कळवाव्यात. नागरिकांच्या सूचनांवर अभ्यास आणि विचार करुन अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून वाहतूक बदलांबाबत अंतिम आदेश लागू केले जातील अशी माहिती पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

मेट्रो मार्गिकांनाही मिळाली मंजूरी

पुणे शहरात हडपसर, लोणीकाळभोर या मेट्रो मार्गिकांसाठी मंजूरी देण्यात आली आहे. आज विधानभवनातील झुंबर हॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील दोन मेट्रो मार्गिकांना मंजूरी मिळाली. यामुळे पुणेकरांचा प्रवास सुखद आणि जलद होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT