सैतानाचा अवतार असल्याचे सांगत महिलेला नग्न करून बळी देण्याचा प्रयत्न
सैतानाचा अवतार असल्याचे सांगत महिलेला नग्न करून बळी देण्याचा प्रयत्न Saam TV
मुंबई/पुणे

सैतानाचा अवतार असल्याचे सांगत महिलेला नग्न करून बळी देण्याचा प्रयत्न

मंगेश कचरे

बारामती: महिला सैतानाचा अवतार असल्याचे समजत मांत्रिकाच्या सल्ल्याने तिला नग्न करत अघोरी कृत्य करत तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची घटना बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे घडली आहे. या प्रकरणी मांत्रिका सह पाच जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्‍या माणिकराव गायकवाड, नीता अनिल जाधव आणि तात्या नावाचा मंत्रिक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

करंजेपुलला राहणाऱ्या महिलेने याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेला लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी हुंडा दिला नाही, म्हणून तिचा छळ करीत होते त्यानंतर दोन्ही दिराने आणि सासूने भूत बाधा झाली असल्याचे पसरवत तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलवले त्याने सांगितल्यानुसार आरोपीकडून लिंबू उतरवणे अंग धुपारे टाकणे भस्म लावणे अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे उपाशी ठेवणे असे प्रकार केले गेले. तात्या नावाच्या मांत्रिकाला घरी बोलावून घेतले हळदी-कुंकवाचे रिंगण तयार करून त्यात महिलेला बसवून नग्न करून अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले.

सासूने तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून तिला दाबून ठेवले हा प्रकार पती आणि मुलाला सांगितले तर तुला ठार मारू अशी धमकी देखील दिली. महिलेच्या रडण्याच्या आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिची सुटका केली. त्यानंतर महिलेने ही घटना आई-वडिलांना माहेरी कळवली त्यानंतर बारामतीत येत सासरच्या लोकांचा विरोधात फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलिसांनी हा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT