Pune Nalesafai Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: आता पुण्याची तुंबई होणार नाही! 'स्पायडर मशीन' करणार नाले सफाई, कशापद्धतीने करणार काम?

Spider Machine For Clean Drains: पुण्यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कारण नालेसफाई न झाल्यामुळे पुण्याची तुंबई झाली होती. आता पुण्यातील नालेसफाई 'स्पायडर मशीन' करणार आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये यावर्षी तुफान पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये अक्षरश: सगळीकडे पाणी पाणी झाले होते. महत्वाचे म्हणजे नालेसफाई नसल्यामुळे, नद्यांमध्ये मोठ्याप्रमाणात गाळ आणि कचरा अडकल्यामुळे पुणे शहरामध्ये पाणी शिरले होते. नदीला आलेल्या पूरामुळे अनेक पुणेकरांच्या घरामध्ये पूराचे पाणी शिरले होते. यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यापुढे पुणेकरांना टेन्शन घेण्याचे कारण नाही. कारण आता पुण्यामध्ये नाल्यांची सफाई 'स्पायडर मशिन'ने केली जाणार आहे.

पुणे शहरातील नाले अरुंद आहेत. तेथे अन्य मशिनरी पोहचू शकत नाहीत आणि मनुष्यबळाचाही वापर करू शकत नसल्याने स्पायडर मशिनने नाले स्वच्छ केले जाणार आहेत. ३ कोटी ५३ लाख ४२ हजार रुपयांच्या पाच निविदांना स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. नाल्यांमध्ये अवघड ठिकाणी जेसीबी, पोकलेन पोहचू शकत नसल्याने तेथे स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे अत्याधुनिक स्पायडर मशिन वापरून नाले साफ केले जाणार आहे.

पुणे शहरातून सुमारे ३५० किलोमीटर लांबीचे नाले वाहतात. त्यामध्ये कचरा, राडारोडा टाकला जात असल्याने प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. नाल्याला पूर आल्यानंतर शेजारी वस्ती, सोसायट्यांमध्ये पाणी घुसल्याने मोठे नुकसान होते. महापालिकेच्या मलनिःसारण विभागाने नाल्यांची स्पायडर मशिनने स्वच्छता करून घेण्यासाठी परिमंडळ निहाय निविदा काढली आहे. नाल्यांची खोली जास्त असल्याने आणि आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याच्या शक्यतेने मनुष्यबळ लावून काम करता येत नाही. त्यामुळे स्पायडर मशिन लावून हा भाग स्वच्छ केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT