Pune Car Accident News:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Accident: सुसाट पोर्शे कार, मद्यधुंद चालक अन् भयंकर अपघात! बड्या उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं; तरुण- तरुणी ठार

Pune Car Accident News: या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली असून अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलेले आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. १९ मे २०२४

पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत धडक दिल्यामुळे आयटी अभियंते असलेल्या तरुण- तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली असून अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलेले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिस अवलिया आणि अश्विनी कोस्ता हे तरुण- तरुणी एका पबमध्ये पार्टी झाल्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास बाहेर पडले. ते आपल्या दुचाकीवरुन कल्याणीनगर परिसरातून येरवड्याकडे निघाले होते. यावेळी भरधाव वेगात निघालेल्या पोर्से या आलिशान कारने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात तरुणी जागीच मृत्युमुखी पडली.

तर जखमी तरुणाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. या कारचालकाला लोकांनी बेदम चोप दिल्याचेही सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अनिस आणि अश्विनी यांचा मित्र एकीब रमजान मुल्ला यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पो

प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात करणारी मोटर कार प्रचंड वेगात होती. तसेच कारचा चालक हा अल्पवयीन असून तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या गाडीला कोणतीही नंबरप्लेटही नव्हती.

दरम्यान, पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे हॉटेल व पब्ज यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी येत असतात. उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे भीषण अपघात घडत आहेत.असे दुर्दैवी प्रकार टाळण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

Nayanthara Lovestory: विवाहीत प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नयनतारा, धर्मही बदलला मात्र नातं फार काळ टिकलं नाही....

SCROLL FOR NEXT