Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: आंब्यांच्या पेट्यांमधून दारूची तस्करी, १२ लाखांचे विदेशी मद्य जप्त; तिघांना अटक

Liquor Seized In Pune: गोव्यातील मद्याची अवैध विक्री करणाऱ्या ट्रकवर दौंडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. तब्बल १२ लाख रुपयांच्या विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

आंब्याच्या रिकाम्या पेट्यांच्या आड मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. आंब्याच्या लाकडी पेट्यांमधून दारुची तस्करी केली जात होती. गोव्यातील मद्याची अवैध विक्री करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. तब्बल १२ लाख रुपयांच्या विदेशी मद्यासह एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाने (State Excise Department) ही धडक कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा निर्मित मद्याची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कच्या दौंड विभागाच्या पथकाने मोहिम राबवली आहे. आज मोरगाव-सुपे रस्त्यावर मुर्टी गावच्या हद्दीत हॉटेल सानिकाजवळ ट्रकसह आणखी एक वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. या वाहनांमध्ये आंब्याच्या रिकाम्या लाकडी पेट्यांच्या आड लपवून गोवा राज्यात निर्मिती केलेली दारू विक्रीसाठी नेण्यात येत होती.

विविध विदेशी मद्य बँडचे एकूण १२ लाख रुपये किंमतीचे विदेशी मद्य तसेच दोन वाहन, दोन मोबाईल असा एकूण ३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मद्यसाठा अहमदनगर जिल्ह्यात विक्री करण्याच्या उद्देशाने परराज्यातून वाहतूक करुन आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. याप्रकरणी नामदेव खैरे, संदीप सानप, गोरख पालवे, महेश औताडे यांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये २५० ते ३०० गुटख्यांची पोती जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातील नऱ्हे परिसरातून १ कोटी ३९ लाख किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. एकाच ठिकाणी असलेल्या गुटखा कारखाना आणि गोडाऊनवर पोलिसांनी हा छापा टाकला. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT