Pune Love Affair Turns Fatal Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे हादरलं! पुरूषाचं विवाहित स्त्रीसोबत अनैतिक संबंध; लग्नासाठी हट्ट करताच जिवंत जाळलं, शेवटी पुरावा मागे सुटला

Pune Love Affair Turns Fatal: प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबाला कळताच विवाहित पुरूषानं विवाहित प्रेयसीची हत्या केली. पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ.

Bhagyashree Kamble

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच प्रेमप्रकरणाच्या धक्कादायक घटनेमुळे पिंपरी चिंचवड हादरलं आहे. प्रेमसंबंधाबाबत कुटुंबाला माहिती मिळताच विवाहित प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाला माहिती मिळताच विवाहित प्रेयसीनं प्रियकरासोबत राहण्याच हट्ट धरला. याच हट्टाला कंटाळून प्रियकराने प्रेयसीला संपवलं. बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडचा गळा दाबून खून केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे

अनिकेत महादेव कांबळे (वय वर्ष ३३) असे आरोपीचं नाव आहे. तर, राणी विशाल गायकवाड (वय वर्ष २६) असे मृत विवाहित महिलेचं नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनिकेत आणि राणीचे प्रेमसंबंध होते. दोघेही विवाहित असून, दोघांनाही मुले आहेत. राणी बराच वेळ घरी असल्यामुळे तिच्या घरच्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांच्या पथकाने राणीचा शोध घेण्यास सुरूवात केली.

राणीच्या फोन नंबरवरून तात्रिंक तपास सुरू होता. राणीचा नंबर कॅब चालक अनिकेत कांबळेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अनिकेतला ताब्यात घेतलं. तो बार्शी - लातूर भागात गेल्याचं समजताच पोलिसांनी त्या भागातून ताब्यात घेतलं. पोलिसांनी अनिकेतची चौकशी केली. चौकशीत त्यानं गुन्हा कबुल केला.

राणी आणि अनिकेत दोघेही विवाहित होते. दोघांनीही मुले आहेत. कुटुंबाला प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. राणीनं घरदार अन् पोरंबाळं सोडून अनिकेतसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राणीचा हट्ट वाढत गेला. हट्टाच्या त्रासाला कंटाळून अनिकेतनं राणीचा काटा काढला. अनिकेतनं राणीचा गळा आवळला. तसेच लोखंडी पाइपने डोक्यावर वार करत तिची हत्या केली.

अनिकेतनं गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. त्यानं मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. ढोकी गावाजवळ स्थानिकांना राणीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तपास केला असता, हा मृतदेह राणीचा असल्याचं समोर आलं. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: दे धक्का! अजितदादांचं भाजपला जशास तसे उत्तर; 'किंगमेकर' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

राहुल गांधी, सोनिया गांधींना मोठा झटका; नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED च्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाची नोटीस

विजयी मिरवणुकीत राडा; कारवर फटाके फोडण्याला विरोध केला, भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून २ महिलांना मारहाण

राज्यातील सर्वात 'ढ' पक्ष म्हणजे उबाठा, नगरपालिका निवडणुकीनंतर कोणी केली टीका? VIDEO

Skin Care : रोज चेहऱ्यावर पावडर लावता? मग थांबा जाणून घ्या काय होतील साईड इफेक्ट्स

SCROLL FOR NEXT