Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune: पुण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने; जोरदार राडा, पोलिस घटनास्थळी दाखल

या निकालानंतर राज्यभरात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहेत.

Dnyaneshwar Choutmal

Pune: निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय काल जाहीर केला होता. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. अनेकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ही लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

या निकालानंतर राज्यभरात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहेत. पुण्यातही दोन्ही गटामध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. (Pune News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील नवी पेठ भागात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते.

ज्यानंतर दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली.

महत्वाचे म्हणजे केंद्रिय मंत्री अमित शहा आज पुण्यात आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळीच हा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गट काय भूमिका घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मी जराही खचलो नाही, यापुढे अजून जोमाने काम करु अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक शेतीतील प्रगत जिल्हा - देवेंद्र फडणवीस

Pune : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवलं, ६ जणांची ३३ लाखांची फसवणूक; पुण्यातील बंटी बबलीचा पर्दाफाश

Breathing difficulty: 2-3 महिन्यांपासून सुरू होता श्वासाचा त्रास; डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी केली अन् समोर आलं धक्कादायक कारण

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा फेरबदल, बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी

High Cholesterol Warning Sign: जर शरीराच्या या 3 भागांत भंयकर वेदना होत असतील तर व्हा सावध; कोलेस्ट्रॉल वाढल्याचे आहेत संकेत

SCROLL FOR NEXT