Rajgad fort bee attack Saam TV
मुंबई/पुणे

Rajgad Fort : किल्ले राजगडावर मधमाशा चवताळल्या; पर्यटकांना कडाकडा चावल्या, अनेकांच्या तलावात उड्या

Rajgad Fort News : मधमाशांच्या हल्ल्यात 20 ते 25 पर्यटक जखमी झाले आहेत. बारामती येथील पर्यटकांमुळे तीन जणांचे प्राण वाचले आहेत.

Satish Daud

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : किल्ले राजगडावर फिरण्याठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला. मधमाशांनी चावा घेण्यास सुरुवात केल्याने गडावरती एकच गोंधळ उडाला. अनेकांनी जीवाच्या आकांताने गडावरुन खाली धाव घेतली. तर काहींनी स्वतःला वाचवण्यासाठी गडावर असलेल्या पद्मावती तळ्यामध्ये उड्या घेतल्या. मधमाशांच्या हल्ल्यात 20 ते 25 पर्यटक जखमी झाले आहेत. बारामती येथील पर्यटकांमुळे तीन जणांचे प्राण वाचले आहेत.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रविवारी सुट्टी असल्याने मुंबईवरून तसेच बारामती येथून काही पर्यटक किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आले होते. यावेळी बालेकिल्ल्याजवळ असलेल्या पोळावरील मधमाशा चवताळून उठल्या.

मधमाशांनी अचानक पर्यटकांवर हल्ला करत त्यांना चावा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे गडावरती मोठा गोंधळ उडाला. अनेकांनी जीवाच्या आकांताने गडावरुन खाली धाव घेतली. काहींनी जवळच असलेल्या तलावात उड्या घेतल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे आणि विशाल पिलावरे यांनी पर्यटकांना सूचना करत पुरातत्व विभागाच्या कार्यालयामध्ये आसरा दिला.

यामध्ये प्रथम अहिरे (वय.२४ राहणार अंधेरी वेस्ट) याला मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्या तो जखमी झाला. मधमाशा चावताना प्रथम अहिरे हा गडावरुन खाली पळताना दोन ते तीन ठिकाणी तोल जाऊन पडला. किल्ला अर्धा उतरल्यानंतर त्याला उलटीचा त्रास होऊ लागला तसेच चक्कर देखील आली.

दरम्यान गडावर जात असलेल्या बारामती येथील रणजीत बिचकुले, मारुती वाघमारे, योगेश मलगुंडे ,अनिकेत मलगुंडे ,स्वप्निल खरात या तरुणांनी घटनेचे गांभीर्य ओळखत इतर पर्यटकांना गडावर न जाण्याचा सल्ला दिला. तसेच अहिरे याच्या अंगावरील मधमाशांचे काटे काढून त्यास पाणी दिले. त्यानंतर त्याला गडावरून खाली आणून किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साखर गावामध्ये खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT