Pune Stunt Video Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: रील्सचा नाद आयुष्य बरबाद?, मसल स्ट्रेंथ की जीवघेणा स्टंट?; व्हिडीओ होतोय व्हायरल

Pune Stunt Viral Video: स्नायूंच्या शक्तीची चाचणी म्हणजेच मसल स्ट्रेंग्थ टेस्ट करण्यासाठी तरुणीने हा स्टंट केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर सध्या टीका होत आहे.

Priya More

भरत मोहळकर, साम टीव्ही

पुण्यातील तरुणांकडून रिल्ससाठी जीवघेणा स्टंट केल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. एका उंच इमारतीवर चढून हा स्टंट केलाय. स्नायूंच्या शक्तीची चाचणी म्हणजेच मसल स्ट्रेंग्थ टेस्ट करण्यासाठी या तरुणीने हा स्टंट केला. रिल्ससाठी स्टंटबाज तरूण-तरुणींवरहा हा रिपोर्ट आहे.

मरणाला खुलं आव्हान देणाऱ्या या व्हिडीओतील ही तरुणी पाहा कसा जीवघेणा स्टंट करतेय. हा सिन कुठल्या सिनेमातला नाही. तर पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळच्या एका मोडकळीस आलेल्या इमारतीवरील आहे. पुन्हा पहा या तरुणीचा जीवघेणा स्टंट. हात सुटला तर थेट कपाळमोक्षच. मात्र कुठलाही विचार न करता ही तरुणी बिनधास्तपणे हा स्टंट करतीय आणि सोबत आणलेले कॅमेरामन हा स्टंट कॅमेऱ्यात टिपत आहे.

व्हिडीओत दिसत आहे रील्समध्ये तरुण टेरेसवर झोपलाय. त्याने उजवा हात टेरेसवरून खाली सोडलाय. त्या हाताला तरुणी लटकत आहे आणि चहुबाजूंनी हे सगळं कॅमेऱ्यात टिपलं जातंय. मात्र त्या तरुणाला वजन पेललं नसतं किंवा तरुणीचा हात निसटला असता तर थेट तिला जीवालाच मुकावं लागलं असतं. सुदैवाने तरुणीचा जीव वाचलाय. मात्र सोशल मीडियावर रील्स व्हायरल झाल्याने या जीवघेण्या स्टंटवर जोरदार टीका केली जातेय.

माझं तरुणांना आवाहन आहे की केवळ या डिजिटल माध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात येईल अशाप्रकारचे कोणतेही काम करू नये. प्रशासनाने यावर कारवाई केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यातील हा जीवघेणा स्टंट मसल स्ट्रेंथ या प्रकारचा असल्याचं म्हटलं जातंय. मसल बळकट आहेत की नाही याची टेस्ट करण्याच्या अनेक सुरक्षित जागा आहेत. त्यासाठी जीवघेणी उंचावर जाण्याची गरजच काय? चारच दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने हात सोडून दुचाकी चालवण्याचा जीवघेणा स्टंट केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर संभाजीनगरमध्ये रील्स बनवताना कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना वारंवार समोर येतात. पोलिसही अशा प्रकारे जीवघेणे स्टंट न करण्याचं आवाहन करतात. मात्र रील्सचं हे फॅड काही कमी व्हायला तयार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT