Money
Money saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात व्यक्तीकडून बँकेची तब्बल ४७ कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण?

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा ऑटो लोन कॉन्सिलर असलेल्या एका व्यक्तीनेच बँकेची तब्बल ४७ कोटी ६५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पुण्यात (Pune) एका व्यक्तीने स्टेट बँक ऑफ इंडियाला फसवल्याची घटना घडली आहे. पुण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या युनिव्हर्सिटी रोड शाखा आणि टिळक रोड शाखेत हा प्रकार घडला. आदित्य नंदकुमार शेठिया नावाच्या व्यक्तीने ही फसवणूक केली आहे. या प्रकरणी आदित्य नंदकुमार शेठिया (रा. प्रेम नगर हाउसिंग सोसायटी बिबवेवाडी) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१७ ते २०१९ च्या कालावधीत हा सर्व प्रकार घडला.

नेमकं काय घडलं ?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या युनिव्हर्सिटी शाखा आणि टिळक रोड शाखेत २०१७ ते २०१९ या कालावधीत मंजूर करण्यात आलं होतं. ४६ वाहन कर्ज प्रकरणे संशयित असल्याचे ऑडिटमध्ये निष्पन्न झाले होते. हे वाहन कर्ज (Loan) करून देणारे बँकेचे ऑटो लोन कौन्सिलर आदित्य शेठ या यांनी आणि त्याच्या इतर साथीदारांनी कटकारस्थान करून बँकेची फसवणूक केली. खोटे व बनावट कोटेशन टॅक्स इन्व्हाईस मार्जिन आणि फुल पेमेंटच्या रिसीट तयार करून ते खरे असल्याचे भासवले.

त्यानंतर बँकेतून मोठ्या रकमेचे वाहन कर्ज मंजूर करून घेतले. त्यातील काही प्रकरणात सुरुवातीला इतर खात्यावर रक्कम वर्ग केली. रक्कम वर्ग केल्यानंतर संबंधित वाहन कर्जदार यांच्या नावावर ही रक्कम वर्ग केली. अशा प्रकारे बँकेची तब्बल ४७ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांनी फसवणूक केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kareena Kapoor : करीना कपूरच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल करण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय ?

MP Road Accident: मुंडन विधी करुन घराकडे जाताना काळाची झडप, कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ ठार

Konkan: आंब्याच्या लाकडी पेट्या होणार इतिहासजमा, प्लॅस्टिकच्या कॅरेटला बागायतदारांची पसंती; जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: परळीत धनंजय मुंडेंची भर पावसात सभा; बहिणीच्या प्रचारासाठी भाऊ भिजला; बीडमधील समीकरणं बदलणार?

Sunflower Oil: त्वचेच्या समस्यांवर लाभदायी सूर्यफूलाचे तेल , फायदे वाचा

SCROLL FOR NEXT