Pune News  saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: धक्कादायक! आधी १o लाख भरा; रुग्णालयाच्या नियमामुळे जुळ्यांना जन्म देणाऱ्या आईचा मृत्यू, हॉस्पिटल प्रशासनानं दिलं स्पष्टीकरण

Pune News: तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे 10 लाख रुपयांची मागणी केली होती.

Bharat Jadhav

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झालाय. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधी महिलेच्या नातेवाईकांकडे १० लाख रुपये भरावे, अशी मागणी करण्यात आली. पैसे भरले जातील तेव्हाच उपचारासाठी दाखल केले जाईल, असा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतलाय. रुग्णालयाच्या आडमुठेपणामुळे जुळ्या बाळांच्या आईला जीव गमावावा लागलाय.

संबंधित महिलेला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी, प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. तेथे महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला पण दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आता संताप व्यक्त केला जातोय. दीननाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळीच रुग्णालयात दाखल केलं असतं. तरही दुर्घटना टळली असती. याप्रकरणानंतर आमदार अमित गोरखे यांनीही याप्रकरणी पोलिसात धाव घेतली.

दीननाथ रुग्णालयाच्या प्रशासनावर आरोप करण्यात येत असल्याने प्रशासनाच्यावतीनेही आपली बाजू मांडलीय. पुण्यातील महिलेच्या मृत्यू प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाकडून रुग्णालयात अंतर्गत चौकशी करण्यात आलीय. रुग्णालय प्रशासनाकडून वस्तुस्थिती राज्य सरकारला देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिलीय.

काय आहे घटना

तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले. मात्र उपचारासाठी दाखल करायचं असेल तर आधी हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे १० लाख रुपयांची मागणी केली होती. अचनाक इतके पैसे कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनासमोर उभा राहिला.

अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. गर्भवती महिलेचा पती भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. सुशांत भिसे असं त्यांचं नाव आहे. रुग्णालयातील प्रशासन अडीच लाख घेण्यास तयार नसल्याचं पाहिल्यानंतर सुशांत भिसे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.

चौकशी होणार

दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे यांना दाखल करण्यासाठी मुंख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. परंतु रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. दरम्यान या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाचा अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार आहोत. माध्यमात येणाऱ्या बातम्या अर्धवट आहेत. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली.

महिला आयोगाने घेतली दखल

पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणामुळे दोन जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झालाय. या प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतलीय. आयोगाने आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT